एरंडोल शहरातील दगडफेकीस प्रोत्साहन देणा-या घटनेतील प्रमुख मास्टरमाइंड कोण.

Spread the love

पोलिसांनी प्रमुख संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी, पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेप मुळे मोठा अनर्थ टळला.

संजय चौधरी मुख्य संपादक
एरंडोल :-
शांतताप्रिय असलेल्या एरंडोल शहरात
युवकांना दगडफेकीसाठी व आक्षेपार्ह घोषणा देण्यास प्रोत्साहन देणा-या प्रमुख संशयिताचा पोलिसांनी शोध घेवून त्यांना अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. दगडफेक करून आणि आक्षेपार्ह घोषणा देवून दोन समाजात वाद निर्माण करून दहशत निर्माण करून शहराला वेठीस धारणा-या मास्टरमाइंडची शहरातून धिंड काढावी अशी संतप्त प्रतिक्रिया देखील व्यक्त केली जात आहे. शहरात आयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पणा निमित्त पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम शांततेत पार पडले होते.

सर्व कार्यक्रमांमध्ये महिला व युवक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.हजारो भाविकांच्या उपस्थितीत कार्यक्रम शांततेत पारपडल्यानंतर अस्वस्थ झालेल्या समाजकंटकांनी शहरातील शांततेचे वातावरण खराब करण्याचा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न केला. सर्व कार्यक्रम शांततेत पार पडल्यामुळे पोलीस प्रशासनाने देखील सुटकेचा निश्वास सोडला होता. रात्री कासोदा दरवाजाजवळ असलेल्या श्रीराम मंदिरासमोर भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असतांना समाजकंटकांनी वाद निर्माण केला. व एका निरपराध व्यक्तीच्या घरात घुसून 8 ते 10 समाजकंटक यांनी मारहाण केली व गावातून त्या ठिकाणी जाऊन त्या परिसरातील युवकांना प्रोसाहित केले सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास समाजकंटकांकडून अचानक आणि नियोजनबद्ध पद्धतीने शहरात तीन ते चार ठिकाणी दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दगडफेक घटनेतील प्रमुख समाजकंटकांना दगडफेक करण्यासाठी प्रोत्साहन देत असतांना पोलीस प्रशासनाने त्यास अटक का केली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.समाजकंटकांनी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांवरच दगडफेक केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.पोलिसांवर दगडफेक करण्यापर्यंत समाजकंटकांची मजल गेल्यामुळे पोलीस प्रशासनाचा धर्माध समाजकंटकांवर असलेला धाक संपला आहे का असा संतप्त प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.दगडफेक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लागणारे दगड,काचेच्या बाटल्या यांचा ठराविक ठिकाणी साठा करून त्याचा वापर करण्याचे नियोजन समाजकंटक आणि त्यांच्या मास्टरमाइंडने अगोदरच केले असल्याची शक्यता आहे.

शहरात दोन्ही समाजाचे नागरिक एकमेकांच्या सुखदु:खात आणि सार्वजनिक उत्साहात सहभागी होत असतात.मात्र दगडफेक आणि आक्षेपार्ह घोषणांसारख्या प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.यापूर्वी देखील ईद-ए-मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख यांच्या घरासमोर समाजकंटकांनी बाटल्या फोडून आणि आक्षेपार्ह घोषणा देवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.युवकांचे डोके भडकावून
त्यांना दगडफेक आणि आक्षेपार्ह घोषणा देण्यास प्रवृत्त करणा-या प्रमुख संशयिताच्या पोलीस प्रशासनाने कारवाई करून त्याच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.दगडफेकीसारख्या घटनांच्या माध्यमातून दहशत निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणा-या समाजकंटकांचा प्रशासनाने कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी सर्वत्र केली जात आहे.

सद्यस्थितीत शहरात तणावपूर्ण शांतता असून ठिकठीकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, विभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदनवाळ पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल यांचेसह पोलीस कर्मचारी चोवीस तास गस्त घालत आहे.शहरात तणावाचेवातावरण असतांना प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.शहरातील सर्व राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,आजी माजी लोकप्रतिनिधी शांतता राखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.दगडफेक प्रकरणी पोलिसांनी २९ संशयितांना अटक केली असून फरार संशयितांचा शोध घेत आहे.शहरात अफवा पसरवून वातावरण खराब करणा-यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.

चौकट
गांधीपुरा भागातील नदीकिनारी असलेल्या भिंतीवर नेहमी वीस ते पंचवीस टवाळखोर युवक हे बसलेले असतात त्या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या शालेय विद्यार्थी व महिलांशी असभ्य वर्तनाने वागतात त्यामुळे ही भिंत नगरपालिकेने जमीनदोस्त केली पाहिजे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
गावाची शांतता भंग करणारे मोजकेच युवक आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली तर गावात अगदी शांततेचे वातावरण राहील असे दोन्ही समाजाच्या नागरिकांचे मत आहे.
दगडफेक मधील संशयित आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे दोन पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. दोन्ही पदके हे संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.
अटक करण्यात आलेल्या 26 आरोपींना मॅजेस्टेट कोठडी मिळाल्यामुळे जळगाव सब जेल येथे रवाना करण्यात आले आहे.

टीम झुंजार