दिल्ली :- पोलीस दलामध्ये तैनात असलेल्या सहायक पोलीस आयुक्तांच्या बेपत्ता मुलाचे प्रकरण सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे. लक्ष्य चौहान असे मुलाचे नाव असून मित्रानेच त्याचा खून केल्याचे उघडकीस आला आहे. उधारीच्या पैशातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस आयुक्त यशपाल चौहान यांचा 26 वर्षीय मुलगा लक्ष्य चौहान हा 22 जानेवारीच्या संध्याकाळ पासून बेपत्ता होता. लक्ष्य व्यवसायाने वकील होता.
तीस हजारी कोर्टात लिपिक म्हणून काम करणाऱ्या विकास भारद्वाज आणि अभिषेक या दोन मित्रांसोबत तो हरियाणातील भिवानी येथे एका लग्नामध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. मात्र तेव्हापासून तो बेपत्ता होता.सहायक पोलीस आयुक्त यशपाल चौहान यांनी दुसऱ्या दिवशी (23 जानेवारी) मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार समयपूर बदली पोलीस ठाण्यात दाखल केली. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांनी दिल्लीतील नरेला येथील जवाहर कॅम्पमधून 19 वर्षीय अभिषेकला अटक केली.
चौकशीदरम्यान त्याने विकाससोबत मिळून लक्ष्यचा खून केल्याची कबुली दिली. पोलीस चौकशीदरम्यान अभिषेकने सांगितले की, 22 जानेवारी रोजी विकासने आपल्याला फोन करून हरियाणातील सोनीपत येथे लग्नासाठी सोबत येण्यास सांगितले. सोमवारी दुपारी आम्ही मुकरबा चौकात भेटलो आणि एसयूव्ही कारने सोनीपतकडे रवाना झालो. लक्ष्यने विकासकडून पैसे उधार घेतले होते, मात्र ते परत देण्याऐवजी तो त्याच्यासोबत गैरवर्तन करत होता. त्यामुळे आम्ही त्याचा काटा काढण्याचा कट रचला.23 जानेवारीच्या पहाटे कार्यक्रमाहून परतत असताना पानिपतजवळ लक्ष्यला कालव्यात ढकलले आणि आम्ही तिथून पळ काढला.
त्यानंतर लक्ष्यची कार घेऊन आम्ही दिल्लीत आलो. विकासने मला दिल्लीतील नरेला येथे सोडले आणि तो गाडी घेऊन निघून गेला, अशी कबुलीही अभिषेकने दिली.दरम्यान, अभिषेकच्या कबुलीनंतर पोलिसांनी भादवि कलम 302 आणि 201 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अभिषेकला बेड्या ठोकल्या असून विकासचा शोध सुरू केला आहे. तसेच लक्ष्यचा मृतदेहाचा शोधही पानिपतमधील कालव्यात सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






