Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी लग्नात डान्स करतानाचा तर कधी गाणी म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल होत असतो. कधी नवरदेव – नवरी उखाणे घेतानाचा व्हिडीओ तर कधी अनोख्या प्रथेचा व्हिडीओ व्हायरल होत असतो. सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक ब्राम्हण लग्नात चक्क मंगलाष्टके गाताना दिसत आहे. हा ब्राम्हण ज्या प्रकारे मंगलाष्टके गाताना दिसतो, ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. सध्या हा मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. लग्नात मंगलाष्टके सुरू असतात. स्टेजवर नवरदेव आणि नवरी एकमेकांसमोर उभे असतात. त्यांच्या अवती भोवती पाहूण्यांची खूप गर्दी असते. एक ब्राम्हण मंगलाष्टके गाताना दिसतो. स्टेजच्या खाली पाहूणे मंडळी बसलेली असतात. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ब्राम्हण मंगलाष्टके गाताना दिसत आहे. ब्राम्हणाचा सूर पाहून सर्व जण पोट धरुन हसत आहे. स्टेजवरील आणि स्टेजच्या खाली बसलेले पाहूणे जोरजोराने हसताना दिसत आहे. ब्राम्हण ज्या सुराने मंगलाष्टके गाताना दिसतो त पाहून तुम्हालाही खूप हसू येईल.
ब्राम्हणाचे चेहऱ्यावरील हाव भाव आणि हाताच्या हालचाली पाहून तुम्हीही थक्क व्हाल.हल्ली लग्नात मंगलाष्टकेची ऑडियो क्लिप लावतात पण काही ठिकाणी ब्राम्हण स्वत: मंगलाष्टके गाताना दिसतात. ब्राम्हण जेव्हा स्वत: लग्नात मंगलाष्टके गातात, तेव्हा हे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे अनेक जण ब्राम्हणाकडून मंगलाष्टके गाऊन घेतात. या व्हिडीओमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की ब्राम्हणाला मंगलाष्टके गायला सांगितले आहे पण जेव्हा ब्राम्हणाने मंगलाष्टके गायले, तेव्हा लग्नाच्या मंडपात एकच हशा पिकला.
marathimemesduniya या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, ‘मित्रा तुझ्या लग्नामध्ये हाच ब्राम्हण बघ’ या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. जवळपास अडीच हजार लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






