जळगाव : खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी यासह १३ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे (२३) व गणेश उर्फ काल्या रवींद्र सोनवणे (२०), रा. कांचननगर यांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.तसे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सोमवार, २९ जानेवारी रोजी काढले.आकाश सपकाळे व गणेश सोनवणे या दोघांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, चोरी, दंगल, घातक हत्यार बाळगणे, गंभीर दुखापत, मारामारी, मालमत्तेचे नुकसान यासह वेगवेगळे १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
हे दोघेजण टोळीने गुन्हे करायचे. त्यामुळे नागरिकांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाल्याने शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक फौजदार संजय शेलार, पोहेकॉ अश्वीन हडपे, परिष जाधव, पोकॉ राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे, किरण वानखेडे यांनी दोघांच्या हद्दीपारीचा प्रस्ताव पाठविला. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी प्रस्तावाची चौकशी केली.
यात टोळी प्रमुख आकाश सपकाळे व सदस्य गणेश सोनवणे या दोघांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले. या प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहीम, पोहेकॉ सुनील दामोदरे यांनी पाहिले.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






