यावल : तालुक्यातील डांभुर्णी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी २१ वर्षीय संशयित तरुणाला अटक केली आहे. या तरूणाची दुचाकी अल्पवयीन मुलीच्या अपहरण कर्त्याकडे असुन याचं दुचाकीव्दारे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. या अपहरणात एक विधी संघर्षित बालकासह तिघांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले असून अटक करण्यात आलेल्या तरुणाला यावल न्यायालयाने एक फेब्रुवारी पर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
डांभुर्णी ता. यावल या गावातून दिनांक २१ जानेवारी रोजी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते व या प्रकरणी अज्ञात विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा या गुन्ह्याचा तपास करतांना पोलिसांनी मंगळवारी डांभुर्णी गावातील धम्मदीप सुधाकर जंजाळे वय २१ या तरुणाला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की प्रवीण प्रकाश सोळुंके रा.डांभुर्णी याने अल्पवयीन मुलीचे त्यांच्या दुचाकी क्रमांक एम.एच.१९ ई.सी.६६५८ द्वारे अपहरण केले व ही मोटरसायकल अजूनही प्रविण सोळुंके कडे आहे.
अशी माहिती दिली यात गावातील एक १६ वर्षीय विधी संघर्षीत बालकाचा देखील समावेश असल्याचे उघडकीस आले आहे तेव्हा अटक करण्यात आलेल्या धम्मदीप जंजाळे यास यावल येथील न्यायालयात न्यायाधीश एस.बी. वाळके यांच्यासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला १ फेब्रुवारी पर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मित्रास दुचाकी देणे या तरूणाच्या चांगलेचं अंगलट आले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, श्याम धनगर करीत आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन