वैरी बाप! मुलगा अभ्यास करत नाही, खोड्या काढतो, मोबाईल मागतो म्हणून बापानेच मुलाला कोल्ड ड्रिंकमध्ये विष घालून पाजले

Spread the love

सोलापूर :- शाळेत खोड्या करतो आणि वारंवार मोबाईल मागतो म्हणून बापानेच स्वतः च्याच मुलांना कोल्ड ड्रिंकमध्ये विष घालून जीवे मारल्याचे दुर्दैवी घटना सोलापुरात घडली आहे. सोलापूर शहर हे सोमवारच्या दिवशी अतिशय दुर्दैवी घटनानी हादरून गेले आहे.सकाळ सकाळी तीन जिवलग मित्र दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये मरण पावले. त्या घटनेने सोलापूर हळूहळून निघाले. याचं दुःख संपते ना लगेच एका बापाने स्वतःच्याच मुलाचा जीव घेतल्याची दुसरी दुर्दैवी घटना समोर आली.दिनांक 13 जानेवारी रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास, सोलापूर-तुळजापूर हायवे रोडवरील सर्विस रोडलगत नाल्याजवळ एक लहान मुलाचा मृतदेह आढळला होता.

संबंधित माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिसांनी तत्काळ मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले असता त्याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केलं होतं. पोलिसांनी तपास केला असता त्या मुलाची ओळख विशाल विजय बट्टू (वय- 14 वर्षे, राहणार भवानी पेठ सोलापूर) अशी पटली.आपल्या राहत्या घरातून तो सायंकाळी घराबाहेर पडला होता. पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली आणि घरापासून ते घटनास्थळापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. पोलिसांच्या तपासात स्वतः फिर्यादीचे पती म्हणजेच मयत मुलाचे वडील यांनीच खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी मुलाच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. २८ तारखेला पत्नीसोबत झालेल्या भांडणात विजय बट्टूने उडतउडत सांगितलं होतं की त्यानेच मुलाला मारलंय. त्यानंतर पत्नीचा संशय बळावला. तिने पोलिसात जाऊन यासंदर्भातील माहिती दिली. पोलिसांनी विजय बट्टूला अटक करत त्याची चौकशी सुरु केली होती. सुरुवातीला तो पोलिसांशी सहकार्य करत नव्हता. उडवाउडवीचे उत्तरं देत होता.

पण, पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी खाक्या दाखवताच तो बोलता झाला. आरोपीने अनेक खुलासे केले आहेत. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, इतक्या क्षुल्लक कारणासाठी आपल्या मुलाची हत्या केलेल्या बापावर संताप व्यक्त केला जात आहे. सदर गुन्ह्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भादवि 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून यापुढील तपास पोनि जगताप हे करत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार