Viral Video: पोलीस हे समाजाचे रक्षक असतात; मात्र तेच नागरिकांशी क्रूरतेने वागले तर कसं होईल? तेलंगण राज्यात अशीच एक घटना बुधवारी 24 जानेवारीला घडली. त्या भयानक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तेलंगण राज्यातल्या रंगारेड्डीमध्ये स्कूटीवरून जात असलेल्या दोन महिला पोलिसांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका महिला कार्यकर्तीला केस धरून आधी पाडलं आणि नंतर तिला ओढत घेऊन गेल्या. असं सांगितलं जात आहे, ती तरुणी काँग्रेस सरकारच्या विरोधात आंदोलन करत होती. ही तरुणी प्रोफेसर जयशंकर तेलंगण स्टेट अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे.
युनिव्हर्सिटीची 100 एकर जमीन हायकोर्टाच्या उभारणीसाठी देण्याच्या सरकारच्या निर्णयाला ती तरुणी विरोध दर्शवत होती.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावर चर्चा सुरू झाली आहे. बीआरएसच्या नेत्या के. कविता यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घ्यावी, अशी मागणीही केली आहे. या कृत्यासाठी तेलंगण पोलिसांनी बिनशर्त माफी मागितली पाहिजे, असंही त्या म्हणाल्या. के. कविता यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘तेलंगण पोलिसांनी केलेलं कृत्य चिंताजनक आणि अस्वीकारार्ह आहे. शांततेने विरोध व्यक्त करत असलेल्या विद्यार्थिनीला ओढत नेणं आणि तिच्या दुर्व्यवहार करणं ही बाब तेलंगण पोलिसांची आक्रमकता दर्शवते. मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी आणि संबंधित व्यक्तींविरोधात कडक कारवाई करावी,’ असं त्यांनी लिहिलं आहे.हायकोर्टाची नवी इमारत उभारण्यासाठी युनिव्हर्सिटीची जमीन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याला अनेक विद्यार्थी आणि अन्य नागरिक विरोध करत आहेत.
त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बुधवारी विरोध व्यक्त करणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. त्या वेळी 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी सांगितलं, की पोलीस जेव्हा त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा काही आंदोलक विद्यार्थ्यांनी पळ काढला.या प्रकरणाचा अधिक तपास करणं आवश्यक असल्याचं मतही पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलं. महिला पोलिसांनी पळणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ही घडली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तथापि, या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला जात आहे.
हे पण वाचा
- हृदयद्रावक…सात जन्माचं वचन देताना नवरदेवाच्या छातीत कळ आली; लग्नाच्या विधींपूर्वीच वराने घेतला वधूच्या कुशीतच अखेरचा श्वास.
- धक्कादायक! पत्नीचे तिच्या मित्राशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने भररस्त्यावर चाकूने वार करून केली पत्नीची हत्या.
- अमळनेर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार.पोलिसात गुन्हा दाखल.
- शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॉक मध्ये तात्काळ नोंदणी करावी-शेतकरी नेते सुनील देवरे ; महाराष्ट्र शेतकरी संघटना तालुकास्तरावर शिबिर आयोजित करणार
- एरंडोल मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसा निम्मित वही तुला