प्रतिनिधी | अमळनेर
येथून जवळच असलेल्या कलाली येथील शेतकऱ्याच्या खात्यातील एक लाख रुपये परस्पर ऑनलाईन वळते करून फसवणूक केल्याप्रकरणी मारवड पोलिसांत सायबर क्राईम व फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कलाली येथील शेतकरी शरद पाटील यांचे निंभोरा येथील बँक ऑफ बडोदा शाखेत बचत खाते असून दिनांक ३० रोजी सायंकाळी ५:३० वाजता त्यांच्या खात्यातून ९९,९९९ रुपये ट्रान्स्फर झाल्याचा संदेश मोबाईलवर प्राप्त झाला.
त्यांनी बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधला असता स्थानिक पातळीवर बचत खाते असलेल्या शाखेत जाऊन माहिती दिली जाईल असे सांगितले ,त्यानुसार दिनांक ३१ रोजी सकाळी निभोरा येथील शाखेत स्वतः खातेदार यांनी बँकेत तपास केला असता सदर रक्कम त्यांच्या खात्यातून नाशिक येथील डी. बी. एस बँकेच्या अज्ञात इसमाच्या खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे आढळून आले.
त्याचे सविस्तर स्टेटमेंट घेऊन लागलीच त्यांनी मारवड पोलीसात धाव घेत संबंधित कागदपत्रे सादर करत तक्रार दाखल केली. त्यावरून मारवड पोलीसा ठाण्यात शरद पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात खातेधारका विरुद्ध सायबर क्राईमच्या माहिती तंत्रज्ञानची विविध तीन कलम व संगनमताने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पीएसआय विनोद पाटील व हवालदार सुनील तेली करीत आहेत
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.