पुणे :- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नालंदा येथे राहणाऱ्या एका डॉक्टरने राहता फ्लॅट पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीसोबत झालेल्या वादानंतर संतापलेल्या या डॉक्टर पत्नीने फ्लॅट पेटवून दिला आणि फ्लॅटला कुलूप लावून माहेरी निघून गेली. या प्लॅटला आग लागल्याचे कळताच आजूबाजूच्या लोकांनी पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र तोपर्यंत संपूर्ण फ्लॅट पूर्णपणे जळून खाक झाला होता. या प्रकरणी पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील नालंदा येथे एका फ्लॅटमध्ये हे डॉक्टर दाम्पत्य राहतात. त्यांच्यात झालेल्या वादामुळे पत्नीने एवढी संतापली की तिने फ्लॅटला आग लावून दिली. आग लावल्यानंतर पत्नीने फ्लॅटला कुलूप लावले आणि माहेरी निघून गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 40 वर्षीय कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट गोविंद वैजवाडे यांनी त्यांच्या पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे.डॉ.गोविंद यांच्या तक्रारीच्या आधारे मुकुंदवाडी पोलिसांनी त्यांची पत्नी वीणा वैजवाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
डॉक्टर जोडप्यामध्ये सतत वाद
झोन II चे पोलिस उपायुक्त नवनीत कानवट यांनी सांगितले की, ‘तक्रारदार हे न्यूरोलॉजिस्ट असून त्यांनी पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांची पत्नीही व्यवसायाने डॉक्टर आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की रविवारी संध्याकाळपासून या जोडप्यामध्ये सतत वाद होत होता. डॉ. वीणा वैजवाडे यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 435 (दुखापत करून आग लावणे किंवा दुखापत करण्याच्या उद्देशाने स्फोटक) आणि 427 (दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉमन मित्राने सोडवला वाद
ही घटना सिडको एन-2, महाजन कॉलनी येथील नालंदा अपार्टमेंटमध्ये घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी या जोडप्याचा वाद वाढला तेव्हा त्यांनी एका कॉमन फॅमिली फ्रेन्डशी त्यांनी संपर्क साधला. तोही व्यवसायाने डॉक्टर आहे. त्या मित्राने या डॉक्टर दाम्पत्यातील भांडण शांत केले. मित्राच्या मध्यस्थीनंतर असे ठरले की वीणा त्या रात्री तिच्या मैत्रिणीच्या दवाखान्यात राहील, जेणेकरून परिस्थिती शांत होईल आणि डॉ. गोविंद त्यांच्या फ्लॅटवर परतले.
ही घटना अतिशय गंभीर – पोलिस
पोलिस अधिकाऱ्यांनी ही घटना गंभीर असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, या घटनेमुळे जीवितहानी आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होऊ शकले असते. तसेच अपार्टमेंटमधील इतर रहिवाशांनाही गंभीर धोका निर्माण होऊ शकला असता.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






