इंजिनीअर तरुणाची विवाहित महिलेशी फेसबुकवर मैत्री अन् प्रेम, दारु पाजून केला बलात्कार,बनविला व्हिडिओ धर्मांतंरासाठी दबाव अन् ब्लॅकमेलिंग

Spread the love

लखनऊ (उत्तर प्रदेश) :- मधील महिलेला फेसबुकवरील तरुणासोबची मैत्री चांगलीच महागात पडली आहे. तरुणाने मैत्री झालेल्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.आरोपीने तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव देखील टाकला. भीतीपोटी महिलेने घर सोडले आणि दुसरीकडे राहायला गेली.त्यानंतरही आरोपीने महिलेला धमकावून त्रास देणे सुरूच ठेवले. याप्रकरणी पीडितेने पोलिसात तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी आरोपीला नोएडा येथून अटक केली. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला गुडंबा पोलीस ठाणे परिसरात राहत होती. तिचा नवरा गुजरातमध्ये काम करतो. दरम्यान महिलेची फेसबुकवर इंजिनीअर असलेल्या निहाल नावाच्या तरुणाशी मैत्री झाली. निहाल हा लखनऊच्या मादियानव येथील शिवानी नगरचा रहिवासी आहे. आरोपी निहाल याने महिलेशी फेसबुकवर मैत्री केल्यानंतर तिला भेटण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्याने महिलेला दारु पाजून तिच्यावर बलात्कार केला आणि व्हिडिओ देखील बनवला.त्यानंतर आरोपी महिलेला व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करुन तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकू लागला.

मात्र तरुणीने विरोध केला म्हणून आरोपीने तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली.पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, भीतीपोटी तिने घर सोडले आणि कुटुंबासह दुसऱ्या भागात राहू लागली. तेथेही आरोपी तिचा पाठलाग करत पोहोचला. यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला नोएडा येथून अटक केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार