नागपूर :- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत एका 26 वर्षीय इंजिनीअर तरूणीवर तब्बल पाच वर्ष बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने पीडितेच्या ओळखीचा फायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखवून, तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कारकेल्याची घटना घडली आहे.ही घटना उजेडात येताच संपूर्ण नागपूर हादरले आहे. या प्रकरणी आरोपी जीम ट्रेनरला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत 26 वर्षीय तरूणी ही इंजिनियर असून ती नागपूरमध्ये एकटीच राहायची. पीडित तरूणीला व्यायामाची आवड असल्याने नजिकच्या जीममध्ये तिने ट्रेनिंग सुरू केली होती. या दरम्यान तिची ओळख जीम ट्रेनर रोहित पांडेसोबत झाली होती. रोहित पांडेची तरूणीशी ओळख झाल्यानंतर त्याने तिच्याशी जवळीक साधली आणि तिच्यावर बलात्कार केला. या दरम्यान तिला काहीच कळू न देता तिचे अश्लील फोटो देखील त्याने काढले होते.पुढे जाऊन त्याने तिचे हेच अश्लील फोटो कुटुंबियांना पाठवण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने या फोटोंच्या माध्यमातून पीडित तरूणीकडून पैसे देखील उकळले.
आरोपीने तब्बल 6.5 लाख रूपये तरूणीकडून उकळते होते. साधारण 2019 पासून ते 16 मार्च 2023 दरम्यान आरोपीने पीडितेवर बलात्कार करून तिच्याकडून पैसे उकळले होते.अखेर आरोपीच्या या जाचाला कंटाळून पीडीतेने पारडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर रोहित पांडेविरोधात बलात्कार आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी जीम ट्रेनर रोहित पांडेला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






