आई-वडिलांनी १७ वर्षीय पोटच्या लेकीच्या विळ्याने वार करून हत्या केली, धक्कादायक कारण आलं समोर

Spread the love

नांदेड :- येथून एक धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरमध्ये आई – वडिलांनी पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्यांनी १७ वर्षीय लेकीला विळ्याने वार करून हत्या केली आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात आई-वडिलांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्हयातील हिमायतनगर येथे ऑनर किलिंगची घटना घडली. परजातीय मुलासोबत पळून गेलेली मुलगी परत घरी आली.

पण तिने मुलाशी लग्न करण्याचा हट्ट मुलीने धरला. याच कारणामुळे मुलीच्या आई-वडिलांनी आपल्याच पोटच्या मुलीची हत्या केली. विळ्याने वार करून 17 वर्षीय अंकिता पवार हिची हत्या केली. मुलगी झोपेत असताना आई – वडिलांनी विळ्याने वार करून तिची हत्या केली. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात मृत मुलीच्या आई -वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

नांदेडच्या हिमायतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या अंकिताचं एका मुलावर प्रेम होतं. ती त्याच्यासोबत घर सोडून पळून गेली होती. काही दिवसानंतर पु्न्हा घरी आली. मुलगी घर सोडून पळून गेल्याने घरचे खूप चिडले होते. घरी आलेल्या मुलीने त्या मुलाशी लग्न करण्याचा हट्ट आई-वडिलांकडे धरला. त्यानंतर आई-वडिलांनी रागाच्या भरात लेकीचा संपवण्याचा कट रचला. लेक झोपेत असताना आई-वडिलांनी तिच्यावर विळ्याने वार केले. या हल्ल्यात १७ वर्षीय अंकिताचा मृत्यू झाला. या घटनेने नांदेड हादरलं आहे. या प्रकरणी अंकिताच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार