Video: लखनऊ:- पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्याचं कंबरडं मोडलं आहे. यामुळे टँकरमधील हजारो लिटर पेट्रोल, डिझेल सुकलेल्या नाल्यामध्ये साचले. पेट्रोलचा टँकर पलटी झाल्यानंतर घटनास्थळी खबरदारी घेतली जात होती. पण, पेट्रोल आणि डिझेल सांचलेले पाहून स्थानिकांची एकच गर्दी उसळली. आधीच पेट्रोल आणि डिझेलचे दर अवाक्या बाहेर गेले आहे. त्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल सांडल्याचे पाहून स्थानिकांनी लुटण्यासाठी घरात जे सापडेल ते घेऊन घटस्थळी धाव घेतली. बघता बघता गावकऱ्यांनी एकच झुंबड उडाली.
लखनऊमध्ये इंडियन ऑईल टॅंकरच्या दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.हे पेट्रोल मिळविण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी झाली होती. जिवाची पर्वा न करता लोक हे पेट्रोल कॅनमध्ये भरून घरी नेताना दिसत होते. एवढंच नाहीतर काही महाभाग हे पेट्रोल बादलीमध्ये भरून घेऊन जात होते. पेट्रोल हा ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे अपघातग्रस्त ठिकाणी कुणी थांबू नये असं ड्रायव्हर सांगत होता, पण लोक त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत इंधन चोरी करण्यात मश्गुल होते. हा संपूर्ण जीवघेणा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर या ठिकाणी गर्दी पांगवण्यात आली. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडली नाही.
ही लुटालूट जीवघेणी…
Anas Ghazi नावाच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पेट्रोल, डिझेल हे हायली एक्सप्लोझिव्ह आहे. यामुळे थोडीशी जरी ठिणगी पडली तरी देखील ते पेट घेऊ शकते. शेजारी टँकर पलटी झालेला होता. त्यात थोडे जरी स्पार्क किंवा शॉर्ट सर्किट झाले असते तरी तिथे मोठा अनर्थ होऊ शकला असता.
पाहा व्हिडीओ






