चाळीसगाव :- गुरुवारी भाजपचे माजी नगरसेवक महिंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला होता. आज उपचारादरम्यान पहाटे त्यांचं निधन झालं आहे.यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महिंद्र मोरे यांच्यावर चाळीसगावमध्ये सिंधी कॉलनी परिसरात असलेल्या त्यांच्या कार्यालयामध्ये हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते.अज्ञात हल्लेखोरांनी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पांढऱ्या कारमध्ये येऊन त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेनं चाळीसगावसह परिसरात एकच खळबळ उडाली होती.
आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तपासचक्र फिरवत कन्नड तालुक्यातील सायगाव येथून गुन्ह्यात वापरलेली कार, जिवंत काडतूसे आणि कोयते जप्त केले आहेत. मात्र अद्यापही हल्लेखोरांचा शोध लागलेला नाहीये.तालुक्यातील सर्व लॉजची पोलिसांनी झाडाझडती घेतली मात्र हल्लेखोर कुठेच मिळून आले नाहीत. त्यामुळे आता हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी पथकांची नियुक्ती केली आहे. हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
बाळू मोरे यांची हत्या पूर्व वैमानस्यातून झाली असावी असा संशय आहे, त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान चाळीसगावमधील स्टेशनरोड भागात बाळू मोरे यांचं वास्तव्य होतं. आनंदवाडी, सिंधी कॉलनी परिसरातून ते अपक्ष तसंच भाजपच्या तिकिटावरही नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. त्यांच्यावर गोळीबार का झाला ? हे अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणात जे सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं आहे, त्याच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.दोन माजी नगरसेवकांचा मृत्यू राजकीय पदाधिकाऱ्यांवर मागील आठवडाभरात गोळीबाराच्या 3 घटना घडल्या आहेत. उल्हासनगर, चाळीसगाव आणि दहीसरमध्ये या घटना घडल्या. या तीन घटनेत दोन माजी नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे. दहीसर गोळीबारामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला, तर आज महेंद्र मोरे यांचा देखील मृत्यू झाला आहे.
कार केली जप्त
चाळीसगाव शहर गु र क्र 56/2024 भादंवि 307, 120(ब ) , 143 , 144, 147, 148 , 149 शस्र्य अधी कलम 3/24 अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेणे कामी पो नि संदीप पाटील स्टाफसह रवाना झाले असताना आरोपींनी वापरलेली कार हि आरोपी शोध घेत असताना सायगव्हाण ( नागद – कन्नड रोडवर ) बेवारस मिळून आली.आरोपी सदर परिसरात लपलेले असल्याची दाट शक्यता असल्याने सदर परिसरातील रिसॉर्ट तसेच कन्नड गावामधील लॉज चेक करून व चाळीसगाव शहरात आरोपी शोधकमी कोम्बिंग ऑपेरेशन राबवण्यात आले आहे …परंतु आरोपी मिळून आले नाहीत आरोपी शोध कामी पथक रवाना करण्यात आली आहे.मिळून आलेल्या कार मध्ये 02 जिवंत काडतूस , 02 खाली , एक कोयता मिळून आले.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
म






