संचारबंदी नंतर शांतता समितीची बैठक घेण्याची प्रशासनाची तयारी
यावल : तालुक्यातील दहिगाव येथे बुधवारी रात्री रमाबाई आंबेडकर जयंती च्या मिरवणूकीत महापुरूषाच्या पोस्टरची विटंबना केल्याच्या आरोपावरून वाद उफाडला होता व पोस्टरच्या विटंबनेच्या संशयावरून ६ जणांना अटक करीत तब्बल ४० जणां विरूध्द गुन्हे नोंदवण्यात आले होते आणी दहिगावात संचार बंदी लावली आहे. तर या घटनेच्या पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षक एम.सी.व्ही. महेश्वर रेड्डी यांनी गावात भेट दिली तर संचार बंदी भागात डिवायएसपींनी पाहणी करीत संचार बंदी नंतर गाव पुर्वपदावर आणण्या करीता गावात शांतता समितीची बैठक घेण्या सदंर्भात तयारी दर्शवली आहे.
दहिगाव ता.यावल या गावात बुधवारी रात्री रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. सहवाद्य काढण्यात आलेली ही मिरवणूक गावातील कुंभारवाडा भागातुन पुढे मार्गस्त झाली व समारोप करण्यात आला दरम्यान कुंभार वाडा भागात महापुरूषाच्या पोस्टरची विटंबना करण्यात आली असा आरोप मिरवणुकीतील कार्यकर्त्यांवर करण्यात आला तेव्हा तर या प्रकरणी गुरूवारी रात्री एका गटातील फिर्यादी वरून सहा जणांना अटक करण्यात आली होती तर डिवायएसपीसह त्यांच्या पथकाशी धक्काबुक्की प्रकरणी ४० जणांवर गुन्हा दाखल करीत गावात ४८ तासांसाठी संचार बंदी लावली आहे या घटनेच्या पार्श्वभुमीवर गुरूवारी मध्यरात्री पोलिस अधिक्षक एम.सी.व्ही. महेश्वर रेड्डी यांनी गावात भेट दिली घटनेची माहिती घेत आढावा घेतला तर शुक्रवारी डीवायएसपी अन्नपुर्णा सिंग यांनी गावात संचार बंदी असलेल्या भागात पाहणी केली.
शांतता समितीची बैठकीची तयारी.
पत्रकारांशी बोलतांना डीवायएसपी अन्नपुर्णा सिंग यांनी सांगीतले की गावातील संचार बंदी संपल्यावर जनजिवन पुर्वपदावर आणणे तसेच गावात शांतता प्रस्तापित व्हावी या करीता प्रशासना कडून आम्ही सर्व पक्षीय,सर्व धर्मियांची शांतता समितीची बैठक घेण्याची तयारीत आहोत लवकर गाव पुर्व पदावर येईल अशी अपेक्षा आहे असे त्यांनी सांगीतले.
गावात चोख बंदोबस्त.
गावात लावलेली संचार बंदी ही शनीवारी सायंकाळी ७.३० ला शितील होईल व त्यानंतर संचार बंदी हटवण्याचा निर्णय जाहिर होणे अपेक्षीत आहे. तेव्हा संचार बंदीच्या पार्श्वभुमीवर गावात १०० हुन अधिक शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन