गोपालगंज : पतीच्या निधनानंतर विधवा पत्नीकडे समाज वेगळ्या नजरेनं पाहतो; मात्र पत्नीच्या भावनांचा व तिच्या गरजांचा विचार केला जात नाही. काही वेळा पत्नीने दुसरं लग्न केल्याच्या घटनाही घडतात. बिहारमध्ये मात्र अशाच एका घटनेत विधवा पत्नीने चक्क आपल्या चुलत सासऱ्यांशीच लग्न केलं. लग्नाला विरोध झाल्यानं पोलिसात हे प्रकरण गेलं असताना अखेर पोलीस ठाण्याजवळच्या मंदिरातच हे लग्न लावून देण्यात आलं.बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातल्या भोरे पोलीस ठाण्या कार्यक्षेत्रात हे धक्कादायक प्रकरण घडलं.
एका विधवा स्त्रीने तिच्या चुलत सासऱ्याशी लग्न केलं. विशेष म्हणजे या लग्नाला नातेवाईकांचा विरोध होता. त्यामुळे हे प्रकरण पोलिसात गेलं होतं. पोलिसांनी समजावूनही त्यांनी न ऐकल्यामुळे अखेर त्यांचं लग्न लावून देण्यात आलं.IANSच्या एका रिपोर्टनुसार, बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात सासरा आणि सुनेच्या लग्नाचं प्रकरण समोर आलंय. भोरे ठाणे क्षेत्रातल्या दुबवलिया गावातलं हे प्रकरण आहे. तिथे एका व्यक्तीचा 6 महिन्यांपूर्वी एका दुर्घटनेत मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या विधवा पत्नीसमोर 4 मुलांच्या पालनपोषणाचा प्रश्न उभा होता.
नवऱ्याच्या निधनानंतर मुलांचा सांभाळ ती एकटी करत होती. त्यात तिच्या चुलत सासऱ्यांनी तिला मदतीचा हात दिला. हळूहळू तिचा त्यांच्यावरच जीव जडला. दोघांमधले नातेसंबंध खूप पुढे गेले होते. त्यांच्या नातेवाईकांना व स्थानिकांना या गोष्टीचा पत्ता लागला, तेव्हा त्यांनी त्याला खूप विरोध केला. महिला मात्र चुलत सासऱ्यांवर सातत्याने लग्नासाठी दबाव आणत होती. त्याच वेळी तिचे नातेवाईक हे नातं संपवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत होते.रविवारी (4 फेब्रुवारी) हे प्रकरण पोलिसांकडे गेलं.
पोलिसांनी त्या दोघांनाही समजावण्याचा खूप प्रयत्न केला; मात्र त्यांनी ऐकलं नाही. अखेर संध्याकाळी पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या एका मंदिरात दोघांचं लग्न लावण्यात आलं. लग्नानंतर महिला खूप खूश होती. पतीच्या निधनानंतर आयुष्यात आधार मिळाल्याचं तिनं सांगितलं. भोरे पोलीस ठाण्याचे प्रभारी अनिल कुमार यांनी सांगितलं, की पोलीस ठाण्याच्या परिसरातल्या मंदिरात दोघांचं लग्न लावण्यात आलं. नंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं. पोलिसांनीही या प्रकरणात समजावून पाहिलं, मात्र अखेर त्यांचं लग्न लावून देण्यात आलं.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






