ठाणे : गप्पा मारण्याच्या बहाण्याने उपवन येथील एका लॉजवर १६ वर्षीय मुलीला नेल्यानंतर तिला जबरदस्तीने विवस्त्र करून तिचा व्हिडीओ मोबाइलमध्ये काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आवेज खाजा पठाण (२१, रा. आंबेवाडी, वागळे इस्टेट, ठाणे) याला अटक केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी शुक्रवारी दिली. तिने या प्रकाराला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
वागळे इस्टेट परिसरात राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीच्या बालमनाचा गैरफायदा घेऊन तिच्याशी मैत्री करण्यासाठी आवेज हा नेहमी तिचा पाठलाग करीत होता. तिला जाळ्यात ओढून नाश्ता करण्याच्या बहाण्याने उपवन येथील एका लॉजवर नेले. आवेजने चाकूच्या धाकावर तिला जबरदस्तीने कपडे काढण्यास भाग पाडले. ती विवस्त्र असताना मोबाइलमध्ये फोटो आणि व्हिडीओ काढून ते तिच्या आई- वडिलांना दाखविण्याची तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
उपवन येथील श्लोक लॉज आणि टिकूजिनीवाडी जवळील जंगलात जबरदस्तीने तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ही घटना तिने तिच्या मानलेल्या भावाला सांगितल्याचा राग मनात धरून तिला ६ फेब्रुवारी २०२४ राेजी लाथाबुक्क्यांनी आणि बेल्टने जबर मारहाण केली. हा सर्व प्रकार फेब्रुवारी २०२२ ते ६ फेब्रुवारी २०२४ या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये घडला. या सर्वच प्रकाराला कंटाळून तिने अखेर विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
तिला तातडीने उपचारासाठी ८ फेब्रुवारी २०२४ रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात बलात्कारासह पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांच्या पथकाने आवेज पठाण याला गुरुवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून बेल्ट आणि चाकू जप्त केला. पोलिस उपनिरीक्षक अनिल शेळके हे अधिक तपास करीत आहेत.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






