यवतमाळ: शहरातील खुनाचे सत्र सुरूच आहे कळंब चौकात गोळीबार करून युवकाची हत्या झाली. त्या पाठोपाठ शुक्रवारी रात्री गोदनी मार्गावर गुरुनानक नगर मध्ये साडेतीन हजाराच्या उसनवारी करिता दगडाने ठेचून युवकाचा खुन करण्यात आला. सचिन शंकर माटे असे मृताचे नाव आहे . तो गुरुनानक नगरमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत पडून होता. या प्रकरणी सचिनचे वडील सुखदेव शंकर माटे रा. गुरुनानक नगर गोधणी रोड यवतमाळ यांनी तक्रार दिली त्यावरून अवधुतवाडी पोलिसांनी विक्की भेंडे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.
सचिनने घर शेजारी राहणाऱ्या विक्की कडून ३ हजार ५०० रुपये उसने घेतले होते. ही रक्कम सचिन वेळेत परत करू शकाल नाही, पैश्याकरिता विक्की नेहमी तगादा लावत होता. शुक्रवारी सचिन जेवण करून घराबाहेर पडला असता त्याच्यावर विक्की व त्याच्या सहकाऱ्यांनी हल्ला करून ठार केले. घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिस, अपर अधीक्षक पियुष जगताप यांनी घटना स्थळी भेट दिली. शुक्रवारी रात्री पोलिसांनी एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






