फौजीच्या पत्नीला आला संशय, आपल्या पतीचे एकीशी अनैतिक संबंध, तिला हटवण्यासाठी बोलवले घरी,डोक्यावर वार करून केली हत्या.

Spread the love

बोकारो (झारखंड):- सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची पतीशी ओळख झाली होती व त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते. यामुळे तिला घरी बोलावले व हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला. अशी कबुली सैनिकाच्या पत्नीने व तिच्या भावाने पोलिसांसमोर केली आहे. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त व मोटारसायकल जप्त करत दोघांना अटक केली आहे. राखी शंकर असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.

तिच्या भावाने सांगितले की, झारखंड राज्यातील बोकारो जिल्ह्यामधील निवासी रवि शंकर यांची पत्नी राखी शंकर नोएडाच्या आनंद गर्ल्स होस्टेलमध्ये वार्डन म्हणून कार्यरत होती. इंटरनेटच्या माध्यमातून ती रामकृष्ण उपाध्याय उर्फ फौजी आणि त्याच्या कुटूंबाच्या संपर्कात आली होती.रामकृष्ण फौजी सीआरपीएफमध्ये हेडकांस्टेबल असून तो जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहे. राखी शंकरचे रामकृष्ण उपाध्यायच्या घरी येणे-जाणे होते. राखीचा भाऊ राहुलने फौजीची पत्नी प्रीति उपाध्याय आणि तिच्या भावावर बहिणीच्या हत्येचे आरोप केला आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रीति आणि तिचा भाऊ सुबोध कांत मिश्रा याला अटक केली आहे. पोलीस तपासात प्रीतिने कबूल केले आहे की, राखी शंकर व तिच्या पतीचे प्रेमसंबंध सुरू होते. तिला मार्गातून हटवण्यासाठी तिला फोन करून घरी बोलावले. राखी ३ फेब्रुवारी रोजी घरी आली होती. चार फेब्रुवारी रोजी तिची हत्या केली. तिच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली.भावाच्या मदतीने मृतदेह बाइकवरून जंगलात नेऊन फेकला. पोलिसांनी बाईक व हत्यार जप्त केले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार