Viral Video: क्षुल्लक गोष्टींवरुन हल्ली लोकांमध्ये सतत वादविवाद होत असतात.आपल्या रोजच्या प्रवासात आपल्याला ही अनेक वादविवाद होताना दिसतात. अनेक वाद हे लोकल मधील महिलांच्या डब्यात होताना दिसताता अनेकवेळा या वादाचे कारणं ही अतिशय क्षु्ल्लक असे असते.अनेकवेळा साधारण चाललेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत होते ते आपल्याला कळत नाही.अशातच सोशल मीडियावर दोन महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
नेमकं या महिलांच्या हाणामारीचे कारण तरी काय असेल पाहुयात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर(ट्वीटर)व्हायरल होत असून एक्सवरील@gharkekaleshया अकाऊंटवर महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ आपण पाहू शकतो. सोशल मीडियावर याआधीही आपण दिल्लीत मेट्रोमध्ये महिलांच्या हाणामारीचे तसेच बसमध्ये वादविवादाचे अनेक व्हिडिओ पाहिले आहेत. एक असे ठिकाण नसेल तिथे महिला कोणत्या गोष्टीत पाठी राहिल्या नाहीत.
नेमकं कारण तरी काय?
व्हायरल होत असलेला व्हिडिओ बंगळूरमधील असल्याचे समजते. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, सर्व प्रकार एका बसमधील आहे. या बसमध्ये आपल्याला अनेक प्रवासी दिसून येत आहेत.यात बसच्या पुढे असलेल्या सीटच्या तिथे दोन महिला चक्क एकमेंकीना मारत आहे. अनेक प्रवासी फक्त महिलाची हाणामारी पाहत आहेत.या महिला एकमेंकीना चप्पलने हाणत आहेत. महिलांच्या या हाणामारीचे कारण हे बसची काच लावण्यावरून होते.सध्या सोशल मीडियावर महिलांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून व्हिडिओवर बऱ्याच यूजर्संनी गमतीदार प्रतिक्रिया केल्या आहेत. एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,’अजून जोरात हाणामारी करा’. एक्सवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले असून हजारोंच्या घराच लाईक्स मिळाले आहेत.
हे पण वाचा






