पुणे : पुण्यात बलात्काराच्या घटना लागोपाठ समोर येत आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा बलात्काराची घटना समोर आली आहे. तरुणीला भेटण्यासाठी बोलवलं आणि तिच्यावर स्वत:च्या कारमध्येच बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.पुण्यातील लोणीकंद परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एकमेकांना चांगल्याने ओखळत होते. दोघांमध्ये मैत्री होती. यातून मुलाने मुलीला भेटण्यासाठी बोलवलं होतं.
जर भेटायला आली नाहीस तर जीव देईल, अशी धमकी त्याने मुलीला दिली आणि भेटायला बोलवलं. त्यानंतर तिला कारमध्ये बसायला सांगितलं आणि कारमध्येच तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीेने तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर वडिलांना मारुन टाकण्याची धमकी दिली. तिच्या वडिलांना शिवीगाळ केली.आरोपी वारंवार धमकी देत असल्याने फिर्य़ादी यांनी त्याच्या त्रासाला कंटाळून त्याच्यासोबत बोलणे बंद केले.
याचा राग आल्याने आरोपी गुरुवारी रात्री अकरा वाजता पीडित तरुणी राहत असलेल्या सोसायटीत गेला. त्याने तरुणीच्या वडीलांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. हा प्रकार जून 2021 ते सप्टेंबर 2023 आणि गुरुवारी (दि. 8) रात्री अकराच्या सुमारास वाघोली येथे घडला आहे. या सगळ्या प्रकरणी तरुणीने पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. यावरुन गौरव पांडूरंग बोराटे या 27 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
पुण्यात लैंगिक अत्याचारात वाढ
काही दिवसांपूर्वी वाढदिवसाचा केक कापण्याचा बहाणा करून 15 वर्षीय मुलीला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केला होता. पुण्यातील मांजरी परिसरातील नदीपात्रात ही घटना घडली होती. या घटनेमुळे सगळीकडून संताप व्यक्त केला जात होता. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. अनुराग साळवी आणि गणेश म्हात्रे अशी अत्याचार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तरुण हे पीडित मुलीचे मित्र होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग व गणेश यांनी मुलीला फिरायला नेतो असे सांगून फिर्यादी यांच्या सोबत गाडीवर बसून मांजरी नदीपात्राच्या झाडीत नेलं. तिथे असलेल्या एकांताचा फायदा घेऊन अनुराग साळवी आणि गणेश म्हात्रे यांनी मुलीवर आळीपाळीने जबरदस्तीचे शारीरिक संबंध केले आणि त्यानंतर मुलीला त्या निर्जनस्थळी सोडून निघून गेले. याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला होता.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






