चाळीसगाव :- शहराचे माजी नगरसेवक महेंद्र (बाळू) मोरे यांची गोळ्या झाडून हत्या करणार्या संशयितांपैकी दोन आरोपींच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहे. सचिन सोमनाथ गायकवाड (वय २३ रा. घाटरोड, चाळीसगाव) व अंनिस उर्फ नव्वा शेख शरीफ शेख (हुडको, चाळीसगाव) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.
चाळीसगाव शहर पो.स्टे. येथे दाखल गुन्ह्यातील आरोपीतांनी चाळीसगाव शहरातील नगरसेवक महेंद्र ऊर्फ बाळू मोरे यांचेवर दि.७ रोजी गोळीबार करुन त्यांचा खून करण्यात आला होता. गुन्ह्यातील आरोपी हे फायरिंग करुन पळून गेले होते. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसन नजनपाटील यांना सदर गुन्हयांतील आरोपीतांचा शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले होते.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना दि.११ रोजी गोपनिय माहिती मिळाली की, सचिन सोमनाथ गायकवाड रा.घाटरोड, चाळीसगाव ता.चाळीसगा, जि.जळगाव, अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख रा. हुडको चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव हे अहमदनगर व पुणे येथे गेल्याची माहिती मिळाली होती. एलसीबीच्या पथकातील पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, हवालदार सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील यांना तात्काळ अहमदनगर व पुणे येथे रवाना केले.
त्याप्रमाणे वरील पथकातील पोलीस अंमलदार यांनी वरील आरोपीतांचा अहमदनगर व पुणे येथे गोपनिय माहितीच्या आधारे शोध घेत असतांना त्यांना माहिती मिळाली की, सदर आरोपी हे लोणीकंद परिसर, पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी आरोपींना लोणीकंद परिसरात पिंजून काढून शिताफिने ताब्यात घेतले. पोलीस कारवाई करतांना तपासात हवालदार अक्रम शेख, महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, शिवदास नाईक, हेमंत पाटील, किशोर मोरे, ईश्वर पाटील यांनी सुध्दा सहकार्य केले आहे. आरोपीतांना तपासकामी चाळीसगाव शहर पो.स्टे.च्या ताब्यात देण्यात आले आहे.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






