चुरू : राजस्थानात चुरूमध्ये एका महिलेनं केलेलं कृत्य अंगावर शहारा आणणारं आहे. 4 वर्षांपूर्वी तिनं लव्ह मॅरेज केलं होतं; मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्या पती-पत्नीमध्ये तणाव होता. त्यानंतर एके दिवशी नवऱ्यानं आत्महत्या केल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं; मात्र पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी चौकशी केली असता महिलेचा गुन्हा समोर आला.राजस्थानात चुरूमध्ये हत्येचं एक प्रकरण उघडकीस आलंय. एका महिलेनं लग्नाला 4 वर्षं झाल्यानंतर नवऱ्याची हत्या केली. त्यांचं लव्ह मॅरेज झालं होतं. तिनं दोरीनं नवऱ्याचा गळा आवळला व नंतर त्याच्या मृदेहापाशी ती बसून राहिली.
महिलेनं त्या हत्येला आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला व पोलिसांना माहिती दिली; मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली व अखेर तिचा गुन्हा समोर आला.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना चुरू शहरातल्या ओम कॉलनीमध्ये घडली. भाड्याच्या घरात राहणाऱ्या दीपिका नावाच्या महिलेनं 26 वर्षांचा पती मोहनलाल याची दोरीनं गळा आवळून हत्या केली. त्यानंतर ती मृतदेहापाशी बसून राहिली. त्यानंतर सकाळी तिनेच पोलिसांना माहिती दिली व नवऱ्यानं आत्महत्या केल्याचं सांगितलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांनी परिस्थिती पाहिली. त्यावरून त्यांना संशय आला. एफएसएल टीमनं निरीक्षण केलं, त्यावरून ती आत्महत्या नसल्याचं उघड झालं.
याबाबत चुरूमधल्या पोलीस ठाण्याचे अधिकारी करतार सिंह यांनी सांगितलं, की बर या गावात राहणाऱ्या दलबीर यांनी तक्रार दाखल केली आहे. दलबीर हे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वडील आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, 2019 मध्ये मोहनलालनं दीपिकाशी लव्ह मॅरेज केलं होतं. सुरुवातीला दोघं गावातच राहिले. त्यानंतर गेल्या 8 महिन्यांपासून ते दोघं ओम कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होते. दोघांमध्ये वाद होत होते. दीपिकाला मोहनलालपासून वेगळं व्हायचं होतं. घटस्फोट दिला नाही, तर काहीही करू शकते, असं तिनं अनेकदा सांगितलंही होतं.
त्या दिवशी मोहनलालची हत्या केल्यानंतर तिनेच त्याच्या मृत्यूबाबत कळवल्याचं दलबीर यांनी सांगितलं. दीपिकानेच त्यांच्या मुलाची, म्हणजेच मोहनलालची दोरीनं गळा आवळून हत्या केल्याचा आरोप दलबीर यांनी केला.पोलिसांनी मृतदेहाचं शवविच्छेदन केलं असून त्यानंतर हत्या केल्याच्या आरोपाखाली मोहनलालची पत्नी दीपिका हिला अटक केली आहे. हत्या करून त्याला आत्महत्येचं रूप देण्याचा तिचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला व तिच्यावर कारवाई केली.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






