यावल : तालुक्यातील दहिगाव येथे फैजपुर उपविभागीय कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला व अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई केली. यामध्ये तब्बल २ लाख ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सांयकाळी ७ वाजेला करण्यात आली असुन सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे यावल तालुक्यात खळबळ उडाली आहेत.
दहिगाव ता. यावल या गावात फैजपूर उपविभागीय कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी सात वाजता कारवाई केली यात दहिगाव गावातील यावल रस्त्यावर असलेल्या बालाजी तोल काट्याच्या जवळ जुगार अड्ड्यावर छापा टाकला येथून समीर तडवी, समशेर तडवी, अमीर तडवी, संदीप पाटील, फारुख तडवी, अकील तडवी व संतोष कोळी या सात जणांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून सहा मोटरसायकल, सहा मोबाईल, रोख रक्कम असा एकूण २ लाख १० हजार ४९० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्याच्याविरुद्ध जुगार ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास यावलचे सहायक पोलिस निरिक्षक हरिष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान करीत आहे.
अवैद्य देशी, विदेशी दारू जप्त.
सायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या पथकाने दहिगाव गावात मोरया हॉटेलच्या बाजूला अवैद्य देशी,विदेशी दारू विक्री करणाऱ्या संतोष कोळी यांच्या कडे देखील कारवाई केली देशी-विदेशी दारू अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असतांना ते मिळून आले एकुण १९ हजार ९०० रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दोन्ही कारवाई दरम्यान एकुण २ लाख ३० हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.