यावल : तालुक्यातील सांगवी बुद्रुक शेत शिवारातील शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने ७० वर्षीय वृद्ध इसमाचा मृत्यू झाला. हा निदर्शनास आल्यावर तातडीने त्यांना तेथून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सांगवी बुद्रुक येथील रहिवाशी लक्ष्मण पुंडलिक कोळी वय ७० हे वृद्ध इसम शेतशिवारात गेले होते.
दरम्यान शरद पाटील यांच्या शेतातील विहीर जवळ गेले असता त्यांचा पाय घसरला आणि ते विहिरीत पडले. हा प्रकार निदर्शनास येताच नागरिकांनी विहिरीजवळ धाव घेतली आणि तातडीने त्यांना विहिरीतून काढून यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकसमात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.