समाज परिवर्तनासाठी महिलांचा सक्रीय सहभाग आवश्यकच-समाजसेविका प्रतिभा शिंदे यांचे एरंडोलला मार्गदर्शन

Spread the love


रणरागिणींचा खडतर जीवनप्रवास विधवांचे हस्ते हळदीकुंकू, वाण वाटप-लेक वाचवा, लेक शिकवा-प्रतिज्ञा-राजामाता जिजाऊ महिला मंडळाचा उपक्रम
एरंडोल (प्रतिनिधी) –
समाज परिवर्तनासाठी, जडणघडणीसाठी महिलांचा सक्रीय सहभाग आवश्यकच असावा असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका तथा लोकसंघर्षच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी एरंडोल येथे महिलांना मार्गदर्शन करतांना केले. राजमाता जिजाऊ महिला मंडळ आयोजित कार्यक्रमात शिंदे बोलत होत्या. साई-गजानन मंदिरात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेविका चंद्रकला जैन होत्या.

यावेळी खडतर जीवन जगणार्‍या रणरागिणींचा सत्कार तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासह विधवा भगिनींच्या हस्ते महिलांना हळदीकुंकू आणि वाण वाटप करण्यात आले.
कार्यक़्रमाची सुरूवात राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजनाने आणि जिजाऊ वंदनाने करण्यात आली. यावेळी लेक वाचवा, लेक शिकवा प्रतिज्ञा वाचन करण्यात आले. व्यासपीठावर जिजाऊ महिला मंडळ अध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा शकुंतला अहिरराव, प्रतिभाताई शिंदे, प्रायोजक सुरेखा पाटील, श्रीमती मालती पाटील, करणखेडे ता. अमळनेरच्या पोलिस पाटील शांता पाटील, जळगांवच्या समाजसेविका भिकूताई पाटील उपस्थित होत्या.

आज देखील पती निधनानंतर विधवा महिलांना अनेक कार्यक़्रमांना (शुभ) आमंत्रित केले जात नाही परंतू छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, सावित्रीबाईंच्या शिकवणीनुसार हळदीकुंकू वाटपासह महिलांना संक्रांतीचे वाण वाटप करणे आजची गरज असून त्यांच्या जीवनात आनंद मिळवून देण्याचे काम असल्याचे प्रमुख अतिथी प्रतिभाताई शिंदे यांनी सांगितले. तसेच राजमाता जिजाऊ महिला मंडळासह जिजाऊ ब्रिगेड आणि शहरातील सर्व समाज महिला मंडळांचा सहभाग पाहून प्रतिभा शिंदे यांनी समाधान व्यक्त करून इतर समाजाने देखील आदर्श घेण्याचे आवाहन केले.

महिलांची उपस्थिती (हॉल खचाखच भरलेला) पाहून आनंद झाला असेही स्पष्ट करून महिलांचे कार्यक्रम असेच सुरू राहावेत अशीही अपेक्षा व्यक्त केली.
रणरागिणींचा सत्कार – मंगलताई पाटील खडके-आडगांव, लताताई देसले विखरण, संगीता पाटील पातरखेडे, मोनिका पाटील वडली, सीमाताई अंजनविहीरे, सुनीता पाटील निपाणे, प्रमिला पाटील चांदसणी, लिलाबाई पाटील तरसोद. यावेळी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील बक्षिसपात्र महिला शशिकला जगताप, माधुरी भवार, स्वाती पाटील यांचा यावेळी प्रमुख मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्योत्स्ना पाटील, स्वाती पाटील यांनी गीत सादर केले. तर कानबाईचा जागर, शिवरायांबद्दल प्रेरणादायी गीत सादर केले. यात मनिषा पाटील, अपर्णा पाटील, प्रणाली भोसले, माधुरी भवार, रजनी काळे, शकुंतला पाटील, स्वाती पाटील, वंदना पाटील यांनी सहभाग नोंदविला.कार्यक़्रमाचे प्रास्ताविक शशिकला जगताप, सूत्रसंचालन मनिषा पाटील, आभार वंदना पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी जिजाऊ महिला मंडळासह महिलांनी परिश्रम घेतले. यावेळी साळी समाज महिला मंडळ शोभा साळी, गजानन भजनी मंडळ शशिकला मानुधने, शारदोपासक मंडळ रश्मी दंडवते, वाणी समाज मंडळ शालिनी कोठावदे, रेणूका मंडळ निशा विंचुरकर, जागृती मंडळ दर्शना तिवारी, गजानन मंडळ संध्या चौधरी,

मानसी मंडळ सपना शर्मा आदींसह महिला मंडळ सदस्या छाया पाटील, आरती पाटील, डॉ. स्वाती पाटील, छाया पवार, रेवती पाटील, मिना वसईकर, अंजू पाटील, हिराबाई पाटील, शिला पवार, संध्या पाटील, वैशाली पाटील, मनिषा पवार, विजया पाटील, पुष्पा पाटील, मालती सोनवणे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर सुरेखा मॅडम, मालतीताई पाटील यांचेकडून स्वादीष्ट भोजनाचा लाभ घेतला.

हे पण वाचा

टीम झुंजार