पुणे :- व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलीने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका मजनूने स्वत:च्या हातावर ब्लेडने मारुन घेऊन स्वत:ला जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी युवराज रवींद्र बारडे (वय २४, रा. पर्वती दर्शन) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दत्तनगर परिसरातील एका १६ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १४०/२४) दिली आहे. हा प्रकार फिर्यादीच्या राहत्या घरी मंगळवारी दुपारी सव्वा दोन वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवराज बारडे याने फिर्यादी यांच्याशी २०२३ पासून मैत्री करुन त्यांच्याशी जवळीक वाढविली. तू आवडतेस तुला मीच शिवणार, तुझ्यावर फक्त माझाच अधिकार आहे, बोलत असे़ जर माझ्याशी नाही बोलली व माझ्याशी संबंध नाही ठेवले तर मी माझे बरेवाईट करुन घेईल, अशी धमकी देत असत. फिर्यादी यांच्याशी लैगिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने तो बोलू लागल्याने फिर्यादी या घरी निघून आल्या. त्यांचा पाठलाग करुन तो फिर्यादीच्या घरी आला. फिर्यादी यांनी त्याच्याशी संबंध ठेवण्यासाठी नकार दिल्याने तुम्हाला आता दाखवतोच काय असते ते असे म्हणून स्वत:ला ब्लेडने मारुन घेऊन जखमी केले आहे. पोलिसांनी या मजनूविरुद्ध पोक्सो व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील तपास करीत आहेत.
हे पण वाचा
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.
- राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.गिरीष महाजन यांचा शिक्षक समन्वय संघ जळगाव,च्या वतीने आभार पर सत्कार.
- रस्त्याने जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात गाठून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाही तर ठार मारेन; धमकी देणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक.
- निवासी शाळेतून मुलीचा शाळेचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक व त्यांच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत मृत्यू.
- अल्पवयीन मुलीशी केली मैत्री,फूस लावून बसविले एक्स्प्रेसमध्ये अन् धावत्या रेल्वेत टॉयलेटमध्ये नेऊन नराधमाने केला लैंगिक अत्याचार.