VIDEO: नवी दिल्ली :- सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. जोडप्यांसाठी हा आठवडा अतिशय खास असतो. या दिवसांमध्ये कपल्स, गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात आणि एकमेकांना भेटवस्तू देतात.
तसंच ते एकमेकांना भेटायलाही जातात. पण भेटण्यासाठी योग्य वेळ असावी. चुकीच्या वेळी भेटायला गेलो तर, काहीतरी भलतंच संकट समोर येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. असंच काहीसं एका मुलासोबत घडलं. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मुलगा मध्यरात्री प्रेयसीला भेटायला गेला असता प्रेयसीच्या घरच्यांनी त्याला पकडलं. मग यानंतर जे घडलं ते अतिशय अजब होतं.
लोक प्रेमासाठी अगदी महासागरही पार करतात, असं म्हटलं जातं. मात्र, हे खरंच कोणी केलं की नाही याचा पुरावा नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक प्रियकर आपलं प्रेम दाखवण्यासाठी गुपचूप मध्यरात्री प्रेयसीच्या घरी गेला होता. पण प्रियकराला त्याचं पुढे काय होणार याची कल्पना नव्हती. तो प्रेयसीच्या घरी पोहोचताच तिच्या घरच्यांनी त्याला पकडलं.यानंतर त्या मुलाला खूप मारहाण झाली, असं या प्रकारच्या प्रकरणांमध्ये ऐकायला मिळतं गेली. मात्र या मुलीच्या घरच्यांनी त्याला मारहाण केली नाही. उलट त्याचं लग्न आपल्या मुलीशी लावून दिलं. व्हिडिओमध्ये मुलगा रडताना दिसत आहे. ते आनंदाचे अश्रू आहेत की दु:खाचे हे समजत नाही.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.हा व्हिडिओ व्हायरल होत असून @sarif_video नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत सुमारे एक हजार लोकांनी लाईक केलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक तरुणाची मस्करी करत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिलं आहे की, ‘तो रडण्याचं नाटक करतोय, त्याच्या मनात लाडू फुटत आहेत.’ तर, ‘भाऊ हुंडा न मिळाल्यामुळे रडतोय’, अशी कमेंट आणखी एका यूजरने केली आहे. आणखी एका युजरने कमेंट केली आहे की, ‘तुम्ही खूप चांगलं केलं आहे, इतर लोकांनीही असंच केलं पाहिजे.’






