धरणगाव तालुक्यातील विहीर फाट्याजवळ वाळूच्या डंपरने रस्त्यावर उभा असलेल्या तरुणास धडक दिल्याने तरुण जागीच ठार.

Spread the love

धरणगाव (प्रतिनिधी)
धरणगाव तालुक्यातील विहीर फाटा येथे सकाळी दहा वाजेच्या सुमारास वाळूच्या डंपरने एका व्यक्तीला चिरडल्याची घटना घडली. या अपघातात छोटू प्रकाश कोळी (रा. निंभोरा ता. धरणगाव) हे जागीच ठार झालेत.
या प्रकरणी धरणगाव पोलिसात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेद्र बन्सीलाल बाविस्कर (वय ३९ वर्ष धंदा बांधकाम व्यवसाय रा. मल्हारपुरा चोपडा ता. चोपडा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

त्यानुसार डंपर (क्र.MH 19 3 3505) वरील चालक सुभाष भेनफडु कोळी (रा. डोकलखेडा, ता. पाचोरा) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १४ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास छोटू कोळी हे विहीर फाट्यावर उभे होते. त्यावेळी डंपर चालक सुभाष कोळी याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हाईगाईने डंपर चालवून छोटू कोळी यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कोळी हे करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार