बलिया (बिहार) :– काल 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन दिवस होता. प्रेमी युगुलांसाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. मात्र, यादिवशी घडलेल्या घटनेची मोठी चर्चा होत आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एका मुलीचे अनोखे रुप पाहायला मिळाले.सध्या सोशल मीडियावर एक होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुणी एका तरुणाला मारहाण करताना दिसत आहे. तरुणी खूपच रागात त्या तरुणाला जोडे मारताना दिसत आहे. या प्रकारामुळे याठिकाणी मोठी गर्दीही झाली. हा सर्व प्रकार पाहून लोकांनीही या तरुणाला मारहाण केली. तरुणाने मला सोडून द्या, अशी विनंती केली असता तरी त्याचं कुणीही ऐकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिहार राज्यातील बलिया येथे घडली. एका शाळेची बस येऊन बांसडीह पोलीस ठाण्याजवळ थांबली आणि या मुलाने बसमध्ये प्रवेश केला. यानंतर एक मुलगी बाहेर आली आणि त्या मुलाला मारहाण करताना दिसली. यानंतर त्या मुलाने या मुलीचे मोबाईल हिसकावत फोडला. मग यानंतर मुलीने आपल्या पायातील जोडा काढत त्या मुलाला मारहाण सुरू केली. यानंतर आजूबाजूच्या लोकांनीही या मुलाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याबाबत माहिती देताना बांसडीह पोलीस ठाण्याचे प्रमुख प्रभात कुमार यांनी सांगितले की, दोघांमध्ये चांगली मैत्री होती. मुलानेच मुलीला मोबाईल खरेदी करुन दिला. सुरुवातीला दोघांमध्ये सर्वकाही चांगले सुरू होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. त्यामुळे मुलाने मुलीचा मोबाईल फोडला. दरम्यान, यानंतर दोघांना समजावण्यात आले. तसेच मुलीचा फोडलेला मोबाईल मुलाने दुरुस्त करुन द्यावा अटीवर समझौता करण्यात आला. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी घडलेल्या या घटनेची परिसरात चर्चा होत आहे.
हे पण वाचा
- Viral Video : सोशल मीडियावर रीलसाठी एका तरुणीच्या मूर्खपणा; भररेल्वेस्थानकात असे केले कृत्य लोकांना आला संताप, पहा व्हिडिओ
- शिपायाने दोघांच्या सोबतीने 7 वेळा विषारी इंजेक्शन देऊन केली पत्नीची हत्या; हत्येचे कारण ऐकून पोलीसही झालेत सुन्न.
- 30 हून अधिक विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करून 59 अश्लील व्हिडीओ केलेत पॉर्न साईटवर पोस्ट प्राध्यापकांचे घृणास्पद कृत्य, निनावी पत्रानं प्रकरण उघडकीस.
- भुसावळ तालुक्यात दारूच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या,संशयित आरोपी पती फरार.
- चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सनी दणदणीत विजय!