आरोपी पती पत्नीने पीडितेस 15 दिवस लाँजमध्ये डांबून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला.
पुणे :- अत्याचार केला. तसेच तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला. संबंधित प्रकार अतिशय संतापजनक आणि किळसवाणा आहे. पीडित मुलीच्या वडिलांच्या आजारपणासाठी घेतेलेले अवघ्या 30 हजार रुपयांसाठी आरोपींनी हे कृत्य केलं आहे.संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर संपूर्ण शहरातून संताप व्यक्त केला जातोय. या घटनेत पीडितेचा काय दोष होता? तिच्यासोबत इतकं निर्घृण कृत्य करणाऱ्या आरोपींना तिची जरासुद्धा दया आली नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी हे पती-पत्नी आहेत. त्यामुळे आरोपी महिलेला पीडितेबाबत कोणतीही सहानुभूती वाटली नसावी? आरोपी महिला इतकी निर्दयी असावी? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातून एक धक्कादायक आणि अतिशय संतापजनक अशी घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीला 15 दिवस डांबून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले पैसे न दिल्याने आरोपींनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पीडितेला 15 दिवस लाँजमध्ये डांबून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला. पुण्यातील 3 लाँजमध्ये जाऊन तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला. हा सगळा प्रकार मागील ऑक्टोबरपासून सुरू होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोक्सोसह इतर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पूनम माने (वय 22) आणि आकाश माने (वय 24) या दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला. तसेच पूनम माने हिला पोलिसांनी अटक केलीय. तर तिचा नवरा आकाश हा फरार आहे.
पोलिसांना घटनेची माहिती कशी मिळाली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील आजारी असताना त्यांनी फिर्यादी दाम्पत्ययाकडून उपचारासाठी 30 हजार रुपये उसने घेतले होते. मात्र काही कारणामुळे फिर्यादी यांना ते पैसे परत देता येत नसल्याने आरोपींनी तिला एका लॉज वर नेऊन तिला १५ दिवस डांबून ठेवलं. या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलेल्या तरुणीवर आरोपी आकाश माने वारंवार बलात्कार केला. यावरच न थांबता या दांपत्याने तिला जिवे मारण्याची धमकी देत तिला जबरदस्तीने शरीर विक्रीस भाग पाडले आणि तिला वेशव्याव्यसाय करून आरोपींनी पैसे कमावले
पोलिसांना काल पुण्यातील के के मॉल जवळ एका लॉजमध्ये एका मुलीला डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीची सुटका केली. आता ज्या लॉज वर हे प्रकार घडले आहेत त्या सर्व लॉज मालकांची देखील चौकशी आता पोलीस करणार आहेत. याप्रकरणी आकाश ची पत्नी पूनम हिला अटक केली असून आकाश माने सध्या फरार आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






