एरंडोल :- नासिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या विविध शाळा आणि पोलीस स्टेशन यांना मंजूर
झालेल्या संगणकाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.आमदार सत्यजित तांबे यांनी विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देवून शैक्षणिक क्षेत्रातील आणि शिक्षकांच्या समस्यांची माहिती घेवून सोडविण्याचे आश्वासन दिली.नासिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी शहरासह ग्रामीण भागातील शाळांना भेटी देवून शिक्षक संघटनांच्या पदाधिका-यांच्या भेटी घेतल्या.आमदार सत्यजित तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या शाळा,तहसीलदार कार्यालय आणि पोलीस स्टेशन यांना संगणक संचाचे वाटप करण्यात आले.
पोलीस स्थानकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल आणि हवालदार अनिल पाटील यांनी संगणक संच स्वीकारला. रा.ति. काबरे विद्यालयाच्या पटांगणावर रा.हि.जाजू प्राथमिक विद्या मंदिर,महात्मा फुले हायस्कूल, भालगाव येथील माध्यमिक विद्यालय,बाम्हणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,नागदुली येथील जिल्हा प्रातामिक शाळा,जिल्हा परिषद मुलांची उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक १,पोलीस स्टेशन,तहसीलदार कार्यालय यांचेसह विविध शाळांना संगणक संचाचे वाटप करण्यात आले.
आमदार सत्यजित तांबे यांनी विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिका-यांच्या भेटी घेवून समस्यांची माहिती जाणून घेतली.शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार तांबे यांचे विविध शिक्षक संघटना, कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेससह विविध पदाधिका-यांनी स्वागत केले.ग्रामीण भागातील शाळांना संगणक संच उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्याध्यापक ब शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र देसले,माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे,काबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी मानुधने,शोभा पाटील,बी.के.धूत,रा.हि.जाजू प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी,विठ्ठल मराठे,अमोल वाणी यांचेश शिक्षक संघटनांचे पदाधिकारी,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.