CCTV Video: एका सोनाराच्या दुकानात मालकाच्या डोळ्यादेखत दरोडेखोरांनी लुटलं चोरीच्या थरारक सीसीटीव्ही कॅमेरात कैद.

Spread the love

CCTV Video: दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेक लोकांच्या घरात, दुकानात चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. चोरीचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.हैदराबादमध्ये एका सोनाराच्या दुकानात चोरी झाली आहे.हैदराबादमध्ये भरदिवसा एका सोने-चांदीच्या दुकानात चोरी झाली आहे. दुकान मालकाच्या डोळ्यादेखत ही चोरी करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद शहरातील पट्टापागले येथील एका सोने-चांदीच्या दुकानात ही चोरी झाली आहे. मल्कपेटच्या अकबर भागात असलेल्या किशवा ज्वेलरी शॉपमध्ये ही घटना घडली आहे. दुकानातील लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे. या चोरीमुळे दुकानमालकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV Footage) दिवसाढवळ्या दोन चोर घुसून चोरी करताना दिसत आहे. हेल्मेट घालून तोंड लपवून हे चोर दुकानात घुसले होते. चोरांनी दुकानमालकाला चाकूचा धार दाखवत चोरी केली आहे. चोराने सर्वप्रथम दुकानदाराला धमकावले त्यानंतर खाली पाडले. त्यानंतर चोरांनी सर्व सोन्याच्या वस्तू उचलून पिशवीत भरल्या आणि पसार झाले. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. या सध्या या सर्व घटनेचा पोलिस तपास घेत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार