दोन मुली असलेल्या विवाहितेस इन्स्टाग्रामवर सतत रील्स बनवायची सवय,दोघांमध्ये सातत्याने भांडण, कंटाळून नवऱ्याने घेतला टोकाच्या निर्णय.

Spread the love

चामराजनगर (कर्नाटक) :- पत्नीच्या सतत इन्स्टाग्राम वापराच्या सवयीमुळे पतीने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकातील चामराजनगर भागातील ही घटना आहे. पत्नी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कुमार असं आत्महत्या केलेल्या ३३ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुमार रोजंदारीवर काम करत होता. त्याच्या पत्नीला इन्स्टाग्रामवर रील बनवण्याची सवय होती. यावरुन दोघांमध्ये सातत्याने भांडण होत असतं. मात्र पत्नी काहीही ऐकण्यास तयार नव्हती.

पतीच्या विरोधानंतरही ती सतत इन्स्टाग्रामवर रील्स बनवत असे. पोलिसांनी सांगिगले की, कुमारने आपल्या पत्नीच्या इन्स्टाग्राम रील बनवण्याच्या सवयीला विरोध केला. मात्र पत्नी याकडे दुर्लक्ष करत असे. जेव्हा गोष्टी टोकाला पोहोचली त्यावेळी कुमारने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

इंडियने एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कुमार आणि रुपाच्या लग्नाला जवळपास १० वर्ष झाली होती. दोघांना दोन मुली देखील आहेत. कुमार रोजंदारीवर काम करुन आपलं कुटुंब चालवत होता. मात्र त्याच्या मद्यपानाच्या सवयीमुळे देखील दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. अलीकडेच रूपा कुमारला सोडून तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली.रूपाने एका दुसऱ्या पुरुषासोबत एक रील काही दिवसांपूर्वी अपलोड केली होता. त्यावेळी कुमारने रूपाला या रीलबद्दल विचारणा केली. यावरुन त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर दुर्दैवाने कुमारने आत्महत्या केल्याची माहितीदेखील समोर येत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार