बोदवड नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने बनावट ना हरकत दाखला बनविल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Spread the love

बोदवड :- नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने बनावट ना हरकत दाखला बनविल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. नंदलाल शामराव पठ्ठे (बोदवड) असे संशयिताचे नाव आहे. नगरपंचायतीतर्फे लिपिक विजय नंदलाल अग्रवाल (वय ५१) यांच्या फिर्यादीवरून संशयित नंदलाल शामराव पठ्ठे रा.बस स्टॅन्ड जवळ बोदवड यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयिताने २०१७ मध्ये बोदवड नगरपंचायतीचे बनावट गोल रबरी स्टॅम्प बनवून नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने ना हरकत दाखला मिळण्यासाठी बनावट अर्जावर नगरपंचायत बोदवडचे बनावट गोल रबरी स्टॅम्प मारून तसेच नगरपंचायत कार्यालय बोदवड चा बनावट जावक क्रमांक असलेला बनावट ना हरकत दाखला तयार करून सदर दाखल्यावर मुख्याधिकारी नगरपंचायत बोदवड यांची बनावट सही करून बनावट दाखला तयार केल्याचा आरोप आहे.

लबाडीच्या हेतूने तयार केलेल्या दाखल्याद्वारे भुसावळ उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे वृत्तपत्राच्या नोंदणीसाठी प्रस्ताव जमा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मंगळवारी (ता.१३) रात्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी चौकशी सुरु असल्याने चौकशीनंतर विलंबाने हा गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव तपास करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार