CCTV Video: मॉर्निंगवॉकसाठी घराबाहेर पडलेल्या व्यक्तीला दुचाकीची जोरदार धडक; पहा अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद

Spread the love

CCTV Video: मृत्यू कधी आणि कसा ओढावेल याचा काहीच नेम नाही. आपलं आरोग्य चांगलं रहावं म्हणून अनेक व्यक्ती सकाळी किंवा मग पहाटे चालण्यासाठी घराबाहेर पडतता. मात्र पुण्यात मॉर्निंगवॉक करणे देखील जोखमीचे झाले आहे.कारण आज पहाटे मॉर्निंगवॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीचा भीषण अपघात झाला आहे.सदर अपघाताची घटना रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुण्यातील मगरपट्टा रस्तावरून एक पादचारी जात होता. त्यावेळी समोर येणाऱ्या दुचाकीची त्याला जोरदार धडक बसली.

व्हिडीओमध्ये तुम्ही देखील पाहू शकता की, हा व्यक्ती पहाटेच्यावेळी भरधाव वेगात वाहने येत असताना देखील रस्ता ओलांडत आहे. रस्ता ओलांडताना वाहतुकीच्या नियमांचे पालन पादचाऱ्यांनी देखील केले पाहिजे. मात्र इथे हा व्यक्ती ते नियम मोडताना दिसत आहे. रस्ता ओलांडत असताना सुरुवातीला एक चारचाकी समोर येते. त्यातून हा व्यक्ती पुढे निघतो. तितक्यात समोरून एक दुचाकी येते. दुचाकी भरधाव वेगात असते. अचानक समोरून हा व्यक्ती आल्याने दुचाकीला ब्रेक मारणे कठीण होतं.

दुचाकी वेगात आहे असं दिसत असून देखील आपण धावत रस्ता करू शकतो असं या व्यक्तीला वाटतं. मात्र दुचाकी आणि त्याची जोरदार धडक होते. दुचाकी वेगात असल्याने हा व्यक्ती रस्त्याच्या कडेला फेकला गेलाय. त्यासोबत दुचाकीवरील अन्य दोन व्यक्ती देखील खाली पडल्यात.अपघातात पादचारीगंभीर जखमी झालाय. ज्ञानोबा ढबळे असे जखमीचे नाव असून आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झालाय.

हे पण वाचा

टीम झुंजार