Viral Video: एका तरुणीची नंबर प्लेट नसलेली स्कूटी थांबवली म्हणून तरुणीने वाहतूक पोलिसालाच लगावली कानशिलात पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video: ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करणं हे प्रत्येक वाहन चालकासाठी बंधनकारक आहे. कारण या नियमांची निर्मिती जनतेच्या सुरक्षेसाठीच करण्यात आली आहे. तसेच या नियमांचं उल्लंघन होऊ नये म्हणून जागोजागी ट्रॅफिक पोलीस तैनात असतात.जर तुम्ही नियम तोडले तर तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. अर्थात या पोलिसांना दंड ठोठावण्याचा अधिकार आहे. किंवा अगदीच संशयास्पद परिस्थिती असेल तर ते वाहनाची झडती घेऊ शकतात. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

तात्पुरती कारवाई करुन आरोपींना सोडण्यात येतं. त्यामुळे आरोपींना धाक राहिलेला नाही. असाच एक प्रकार आता पुन्हा समोर आला आहे. यामध्ये एका तरुणीची नंबर प्लेट नसलेली स्कूटी थांबवली म्हणून तिनं चक्क पोलिसांच्याच कानशिलात लगावली आहे. या घटनेचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या आधीही पोलिसांना त्यांचं कर्तव्य बजावताना अशा घटनांना सामोरं जावं लागलं आहे. यापूर्वीही पोलिसांवरील हल्ल्याचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. मात्र यामध्ये या तरुणीचं हिम्मत पाहून सर्वचजण संतापले आहेत.

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओनंतर पुन्हा एकदा पोलिसांच्या सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित होतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही तरुणी अक्षरश: पोलिसांच्या अंगावर धाऊन गेली आणि त्यांना मारहाण केली. तरुणीच्या स्कुटीला नंबर प्लेट नसल्याने पोलिसांनी तिला अडवले त्यावरुन तरुणीने पोलिसांची वाद केले. सध्या सोशल मीडिया एक्सवरील @gharkekaleshया अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे व्हिडीओ व्हायरल होताच राज्यभरातले नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत पोलिसांवर टीका करत आहेत. काहींनी तर ट्रॅफिक पोलीस कशा पद्धतीनं दादागीरी दाखवतात याबद्दल अनुभव शेअर केले आहेत.

पाहा व्हिडीओ

हे पण वाचा

टीम झुंजार