Viral Video: रोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, त्यापैकी काही माहितीदायक असतात तर काही भयावह असतात. अवघ्या काही छोट्याछोट्या गोष्टीवरून मारामारीचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात.दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका तरुणीने पेट्रोलपंपवर क्षुल्लक कारणावरून कार पेटवली आहे. या भयावह कृत्याचा व्हिडिओ पेट्रोलपंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील संतापले आहे.व्हायरल झालेल्या या व्हिडिओत दिसल्याप्रमाणे एक जोडपं पेट्रोलपंपवर कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी येतात दरम्यान तरुणीने तिच्या प्रियकराकडून सिगारेट मागितली होती परंतु त्याने सिगारेट देण्यास नकार दिला. याचाच रागात मनात भरात तरुणीने पेट्रोलपंपवर कारला लाईटरने आग पेटवली. संपुर्ण कारला क्षणातच आग लागते. आग लागताच दोघे जण घटनास्थळावरून पळून जातात.
हा व्हिडिओ X वर @PicturesFoIder नावाच्या अकाऊंट वरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून अनेक युजर्संनी संताप व्यक्त केला आहे. आता पर्यंत हा व्हिडिओ १२ दशलक्ष लोकानी पाहिला आहे. अनेक युजर्सनीं कंमेट करत महिलेला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी देखील केली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






