प्रशांत सरवदे | सावदा प्रतिनिधी
सावदा :- येथील एका रेशन रेशन दुकानावरून एका पुरवठाधारकाने घरी तांदूळ आणले असून त्या तांदुळात चक्क प्लास्टिकचे तांदूळ असल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटाने केला आहे. हा तांदूळ तेरा नंबर वार्ड मध्ये आढळून आला असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील एका रेशन दुकानावरून ऐका गृहिणीने रेशन आणल्यानंतर घरी तांदूळ निचण्यासाठी बसल्यावर हा प्रकार लक्षात आल्यानंतर या महिलेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या पदाधिकाऱ्यांना सर्व प्रकार सांगितला.
तांदुळात मिश्रित असल्याने प्लास्टिकचा तांदूळ सहजासहजी ओळखू येत नाहीये शिजण्यासाठी हा तांदूळ बराच वेळ घेत असल्याने व दातांनी चावून बघितल्याने सदर प्रकार उघडकीस आला आहे. पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर येणार असल्याचे समजते आहे. तरी संबंधित प्रकरणाची जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सावदा शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






