तरुणीने 4 वर्षांपूर्वी केलं दुसऱ्याशी लग्न, तेव्हापासून होता मनात राग, 8 मित्रांना सोबत घेवून केलं अपहरण, निर्जनस्थळी केला सामूहिक बलात्कार

Spread the love

इंदूर :- मधील द्वारकापुरी पोलीस स्टेशन परिसरात 23 वर्षीय तरुणीवर 8 जणांनी सामूहिक बलात्कार केला. तिच्या जुन्या प्रियकराने त्याच्या साथीदारांसोबत तिचे अपहरण करुन निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. तरुणीने 4 वर्षांपूर्वी दुसऱ्याशी लग्न केल्याने आरोपीला राग आला होता आणि त्याला त्याचाच बदला घ्यायचा होता.अतिरिक्त डीसीपी अभिनय विश्वकर्मा यांनी सांगितले की,

पीडित तरुणीने द्वारकापुरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तिने तक्रारीत म्हटले की, या भागात राहणाऱ्या अंकितने सहा महिन्यांपूर्वी तिचे अपहरण केले आणि एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यादरम्यान त्याने तोंड बंद ठेवण्याची आणि कोणाला काही सांगितले तर बहिणीशीही असेच केले जाईल, अशी धमकी दिली होती. मात्र, आता पीडितेने आपला त्रास पोलिसांना सांगितल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून इतरांचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामूहिक बलात्काराचा मुख्य आरोपी अंकित कदम आणि पीडित तरुणी दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. मात्र दोघांचे लग्न होऊ शकले नाही. चार वर्षांपूर्वी पीडितेचे दुसऱ्याशी लग्न झाले. यामुळे अंकित कदम चांगलाच संतापला आणि त्याने अनेकवेळा पीडितेशी संपर्क साधून तिला भेटण्यास सांगितले होते. मात्र पीडितेला अंकितला भेटायचे नव्हते. मात्र, अंकित तिच्यावर सतत दबाव टाकत होता.

पीडितेने पोलिसांना सांगितले की, पीडितेला एक मूलही आहे. काही दिवसांपूर्वी ती कर्जाचे पैसे जमा करण्यासाठी घरातून बँकेत जात होती. यादरम्यान तिला एकटीला गाठून अंकितने अपहरण केले. अंकितने तिला एका निर्जनस्थळी नेले आणि मित्रांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यांनी पीडितेचे हात-पाय बांधले होते आणि तिच्यावर बलात्कार करतानाचा व्हिडिओही बनवला होता. अंकित कदम, विशाल, मिथुन, रवी बंजारा अशी पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार