जळगाव :- शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली. घराची साफसफाई करत असताना महिलेचा तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरून कोसळल्यामुळे तिचा मृत्यू झाला. मनीषा श्याम बावस्कर असे मृत महिलेचे नाव असून त्या एसटी महामंडळात लिपिक म्हणून कार्यरत होत्या. एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
याबाबत असे की, पिंप्राळा परिसरातील श्री रत्न कॉलनीतील दिव्या पार्क अपार्टमेंटमध्ये परिवारासह राहणाऱ्या मनीषा पाटील या सुटी असल्याने घराची साफसफाई करत होत्या. त्यावेळी घरातील उंदराला हॉल लगतच्या बंद गॅलरीच्या स्लायडिंग विंडोतून बाहेर काढण्यासाठी त्या गॅलरीत असलेल्या झोक्यावर चढल्या होत्या. झोक्यातून त्यांचा तोल जाऊन त्या थेट तिसऱ्या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळल्या.शेजारच्यांनी त्यांना उचलून खासगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र काही वेळानंतर त्यांचा मृत्यू झाला. मनीषा यांचे सन २०१५मध्ये श्याम बावस्कर यांच्या सोबत लग्न झाले असून, श्याम हे सीमा सुरक्षा बलात (बीएसएफ) कॉन्स्टेबल आहेत. ते सध्या गुवाहाटी येथे कार्यरत आहेत. त्यांना घटनेची माहिती देण्यात आली मनीषा यांना सहा वर्षांची परी ही मुलगी व कृष्णा नावाचा चार वर्षाचा मुलगा आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






