बदनामीच्या भितीने अल्पवयीन मुलीची आत्महत्या, चार संशयितांनाअटक महिला आरोपीस जामीन मंजूर ४ आरोपींना १४ दिवसांची न्याालयीन कोठडी.

Spread the love

एरंडोल :- किरकोळ वादातून अश्लील शिवीगाळ केल्यामुळे समाजात बदनामी होईल या भितीने सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल (ता.२४) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.याबाबत पोलिसांनी चार संशयितांना अटक केली असून एका महिलेस ताब्यात घेतले आहे.याबाबत माहिती अशी,की गांधीपुरा भागातील भवानीनगर येथील राहणा-या झोपडपट्टीत शुक्रवारी रात्री जोरजोरात आवाज येत असल्यामुळे अल्पवयीन मुलीचे आई,वडील काय झाले म्हणून पाहण्यासाठी घराबाहेर आले.त्यावेळी आनंद समाधान निकम,उषाबाई समाधान निकम, रामसिंग माना निकम,अमोल समाधान निकम, समाधान रामसिंग निकम हे सार्वजन मोठमोठ्याने शिवीगाळ करीत होते.

अल्पवयीन मुलीची आई त्याठिकाणी गेली असता वरील पाचही जणांनी तिला अश्लील भाषेत शिवीगाळ केली तसेच तुझ्या टकल्या नव-याला बाहेर पाठव त्याच्यासह तुझे हातपाय तोडू अशी धमकी दिली. आईला शिवीगाळ करीत असल्यामुळे अल्पवयीन मुलगी आणि तिचा भाऊ त्याठिकाणी आले असता त्यांनाही शिवीगाळ केली.तसेच अल्पवयीन मुलीस अश्लील भाषेत शिवीगाळ करून तिला देखील धमकी दिली.यावेळी शेजा-यांनी पाचही जणांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र संशयितांनी शिवीगाळ सुरु ठेवली.शनिवारी सकाळी मुलीचे वडील कामावर गेले तर आई धुणे धुण्यासाठी गेली होती.

अल्पवयीन मुलीला संशयितांनी शिवीगाळ करून चारित्र्यावर शिंतोडे उडवल्यामुळे आपली समाजात बदनामी होईल या मानसिक भीतीपोटी अल्पवयीन मुलीने सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. अल्पवयीन मुलीचा भाऊ घरी आला असता त्यास बहिणीने गळफास घेतल्याचे दिसून आल्यामुळे त्याने आईला हाका मारून जोरजोरात आरोळ्या मारल्यामुळे नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली.मुलीस तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले असता ती मयत झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.

याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात आनंद निकम,रामसिंग निकम, समाधान निकम,अमोल निकम यांचेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक सुनील लोहार,हवालदार राजेश पाटील तपास करीत आहेत.दरम्यान किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलीस अश्लील शिवीगाळ केल्यामुळे समाजात
बदनामी होईल या भीतीपोटी मुलीने आत्महत्या केल्यामुळे समाजात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

महिला आरोपीस जामीन मंजूर तर इतर ४ आरोपींना न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्याालयीन कोठडी.!

एरंडोल पोलिस स्टेशन येथील गु. र. क्रमांक ४३/२०२४ भा.दवी कलम ३०६,३५२,२९४,५०४,५०६,१४३ प्रमाणे दाखल गुन्हातील आरोपिंना दिनांक २५/२/२०२४ रोजी एरंडोल न्यायालयात हजर केले असता सरकारी पक्षाने न्यायालयीन कोठडी ची मागणी केली तदनंतर आरोपी क्रमांक २ व ३ चा जामीन अर्ज दाखल करण्यात आला व त्या वर सरकारी पक्षाचा व आरोपी पक्षाचा युक्तिवाद होऊन आरोपी क्रमांक ३ उशाबाई समाधान निकम हिचा जामीन अर्ज एरंडोल येथील मे. न्यायालयाने अटी शर्ती सह मंजून केला. व इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली पक्षातर्फे ॲड. रविता देवराज तर आरोपी क्र १ ते ५ तर्फे व ॲड.जयेश अर्जुन पिलोरे व ॲड. अजिंक्य काळे यांनी कामकाज पाहिले.

हे पण वाचा

टीम झुंजार