मुजफ्फरपूर :- मध्ये पती-पत्नीमधील शारीरिक संबंधांबाबत एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका महिलेने आपल्या पतीविरुद्ध शारीरिक संबंध न ठेवल्याबद्दल एफआयआर दाखल केला आहे.महिलेने सांगितले की, लग्नानंतर पतीने एकदाही सेक्स केला नाही. पत्नीने तरुणाविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पतीविरुद्ध एफआयआर नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पत्नीने एफआयआरमध्ये सांगितले की, तिचे लग्न 31 मे 2021 रोजी झाले होते.
मात्र लग्न झाल्यापासून आजतागायत तिच्या पतीने तिच्याशी कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत. हे तिने तिच्या सासरच्या मंडळींना सांगितले, पण त्यांनीही त्यांच्या मुलाला समजवण्याचा प्रयत्न केला नाही. याबाबत पतीची बोलायचं प्रयत्न केला असता, त्याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. या तक्रारीवरून एसएचओ आदिती कुमारी यांनी सांगितले की, या प्रकरणी तिच्या पतीसह 6 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.