जळगाव :- शिरसोली रोडवरील रायसोनी इन्स्टिट्यूटमधील हॉस्टेलमध्ये बीड येथील रहिवासी असलेल्या तरुणाने त्याच्या खोलीत छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार २६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता उघडकीस आली आहे. दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विश्वंभर रत्नाकर खडके (वय २१, रा. ग्रामसेवक कॉलनी, नगर रोड, बीड) असे या मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, विश्वंभर खडके हा तरूण जळगाव शिरसोली रोडवरील रायसोनी इन्स्टिट्यूट मध्ये (R&TC) चे शिक्षण घेत होता. दरम्यान संध्याकाळी त्याची हॉस्टेलमधील खोली क्रमांक ४९ मधील मुले बाहेर गेले होते. खोलीमध्ये कोणीही नसताना विश्वंभर खडके याने छताला दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. सोमवार २६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता रुममध्ये राहणारा शिवमसिंह राजपूत हा खोलीत आला दार आतून बंद होते. धक्का मारून दार उघडताच विश्वंभर हा छताला गळफास घेतल्याचे आढळून आला.
त्याने आरडाओरड केल्यावर शेजारील खोल्यातून इतर विद्यार्थी धावत तिथे पोहोचल्यावर त्यांनी होस्टेल आणि महाविद्यालय प्रशासनाला माहिती दिली. तर एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी महाविद्यालयाच्या होस्टेलमध्ये येऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन कामी तो हलविण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनने घटनेची माहिती घेतली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






