दिंडोरी :- डोहाळे जेवणाचा कार्यक्रमाला गेलेल्या लोकांना घेऊन परतणाऱ्या एका पिकअप व्हॅनला झालेल्या भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २० जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील दिंडोरी इथं हा अपघात झाला.अपघातग्रस्त व्हॅन शाहपुरा पोलीस ठाणे आणि बिचिया पोलीस चौकी हद्दीतील बडझरच्या घाटातून परतत होती. घाटात असताना पिकअप व्हॅन चालकाचं अचानक नियंत्रण सुटलं आणि व्हॅन उलटली. यात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला.
जखमींना उपचारासाठी शाहपुरी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.अपघातात मृत्यू झालेले व जखमी झालेले सर्व लोक आमादेवी गावचे रहिवासी आहेत. मृतांमध्ये ८ महिला आणि ६ पुरुषांचा समावेश आहे.मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
या कठीण प्रसंगातून सावरण्याचं बळ मृतांच्या कुटुंबीयांना मिळो, अशी प्रार्थना मोहन यादव यांनी केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






