पालघर :- जिल्ह्यातील बोईसरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती भांडणानंतर पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आणि नंतर पत्नीने आत्महत्या केली असं म्हणत त्याने पोलिसांची दिशाभूल केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळं दहिसरमध्ये एकच खळबळ उडाली होती.कनिस्क सुरेंद्र पाटील या ३५ वर्षीय व्यक्तीने घरगुती वादातून आपली ३२ वर्षीय पत्नी क्रुताली हिचा गळा दाबून खून केला आहे. नंतर त्याने पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने ती बेशुद्ध पडली, असं सांगून रुग्णालयात नेलं. शनिवारी पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील त्यांच्या घरी ही घटना घडली आहे.
पतीने केली पत्नीची हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आरोपीचे पत्नीशी घरगुती कारणावरून भांडण झालं होतं. भांडण टोकाला गेलं आणि आरोपीने पत्नीचा गळा आवळून खुन केला. ही घटना शनिवारी पहाटे २ ते ५ च्या दरम्यान घडल्याचं सांगितलं जात आहे. भांडण झाल्यानंतर आरोपीने डहाणू तालुक्यातील वसगाव येथे राहणाऱ्या क्रुतालीच्या कुटुंबीयांना फोन करून ती बेशुद्ध पडल्याची माहिती दिली. दरम्यान, पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं भासवून त्याने पत्नीला बोईसर येथील ग्रामीण रुग्णालयात नेलं. तपासणीनंतर डॉक्टरांनी रुग्णाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना कळवलं आणि शवविच्छेदन करण्याची विनंती केली.
आरोपीने दिली खुनाची कबुली
प्राथमिक तपासणीअंती पोलिसांना मृताच्या गळ्यावर खुणा आढळून आल्या. त्यामुळे आरोपीने पत्नीचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. डॉक्टरांकडून मिळालेल्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालावरून असा निष्कर्ष काढण्यात आला की, क्रुतालीचा मृत्यू गुदमरल्यामुळं झाला आहे. एमआयडीसी तारापूर पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीनं खुनाची कबुली दिली.
या जोडप्याने २०१७ मध्ये प्रेमविवाह केला होता. ते वेगवेगळ्या जातीचे होते. आरोपीचं बोईसर येथील पास्थल येथे गॅरेज आहे. तिथे तो चारचाकी वाहनांची दुरुस्ती करतो. तसंच आरोपी एका राजकीय पक्षाचा स्थानिक कार्यकर्ता आहे. आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. या दाम्पत्याला साडेचार वर्षांचा मुलगा आहे.
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






