लग्नाचे आमिष दाखवून,एकच ठिकाणी सेवा देत असलेल्या डॉक्टरने महिलेवर केला वेळोवेळी बलात्कार, डॉक्टरवर गुन्हा दाखल.

Spread the love

बारामती:- लग्नाचे आमिष दाखवून 34 वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या डॉक्टरवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका खाजगी रुग्णालयातील महिलेने याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉक्टर प्रदीप शिंदे (रा. दूध संघ सोसायटी बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि 20 जुलै 2023 रोजी 3 मार्च 2024 पर्यंत शहरातील दूध संघ सोसायटी व जंक्शन येथे वेळोवेळी बलात्कार केला

असल्याचे फिर्यादीने फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादी व डॉक्टर एकच रुग्णालयात सेवेसाठी असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.डॉक्टरने लग्नाचे आमिष दाखवले तसेच त्याच्या राहत्या घरात पीडिते सोबत अनैतिक संबंध ठेवले. झाल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. असे फिर्यादित म्हणले आहे. घटनेचा अधिक तपास मपोसई देशमुख करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार