Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल व्हावं, सर्वत्र आपली चर्चा असावी, आपल्याला लाखो व्हुव्ज मिळावेत यासाठी आजकाल प्रत्येकजण काहीही अतरंगी प्रकार करताना दिसत आहे. रिल व्हिडीओ बनवण्याच्या नादात आपण नेमकं काय करतोय याचं भान देखील नागरिकांना राहिलेलं नाही.अशातच सोशल मीडियावर एक खतरनाक स्टंट रिलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक विवाहीत जोडपं रिल व्हिडीओ बनवत आहेत. रोमान्स आणि डान्स करत त्यांना हा रिल व्हिडीओ शूट करायचा होता.
आता त्यासाठी यांनी झोका बांधायचं ठरवलं. मात्र हा झोका त्यांनी झाडाला नाही तर विहिरीला बांधला आहे. झाडांचा आधार घेत विहिरीच्या मधोमध हा झोका बांधण्यात आला आहे. खोल विहिरीत जाड दोऱ्याच्या सहाय्याने त्यांनी थेट एक चार पायांची खाट बांधली आहे.वहिरीच्या मधोमध बांधलेल्या या खाटेवर दोघेही बसलेत आणि एका गाण्यावर डान्स करत आहेत. तसेच एक व्यक्ती विहिरीबाहेर उभा राहून यांचा रिल व्हिडीओ शूट करत आहे. @sjetivadi या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या दोघांना मरण्याची हौस आहे का? असं काहींनी म्हटलंय. तर भाऊ पूर्ण reel बघितली पण ते पडले नाही? असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. या दोघांना दगड बांधून पाण्यात सोडलं पाहिजे. पागल पणा नका करू रे आयुष्य एकदाच भेटत असत असलं काही करू नका. हे मूर्ख like आणि फोल्लोव्हर साठी काही पण करायला तयार झालेत आश्या पोस्टला लाइक करत जाऊ नका, अशा कमेंट देखील काहींनी केल्या आहेत.
सदर व्हिडीओ इतका भयंकर आहे की पाहता पाहता काळजात काही क्षणासाठी धडकी भरते. कारण आधी हे दोघेही उभे राहून नाचत आहेत. मात्र नंतर काहीच सपोर्ट नसल्याने ते दोघेही खाली पडतात. पती पत्नी दोघेही खाली बसतात तेव्हा हे आता विहिरीत पडणार असं वाटतं. आता या दोघांना पोहता येत असेल तर विषय वेगळा आहे. मात्र पोहता येत नसेल तर मृत्यू निश्चित आहे.
हे पण वाचा
- धक्कादायक! एका व्यक्तीने आपल्या जिवंत पत्नीला सरकारी कागदपत्रांमध्ये मृत दाखवून प्रेयसीशी केलं लग्न.
- संतापजनक!19 वर्षीय नराधम तरुणाने विवाहित महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी,नकार देताच कटरने केले 15 वार 280 टाके टाकून,गोधडीवानी शिवले पीडितेचे अंग.
- आईनं नशा करण्यासाठी पैसे न दिल्यामुळे २७ वर्षीय उच्चशिक्षित मुलाने १३ दुचाकी पेटवून दिल्या; माथेफिरू नशेखोर मुलास अटक.
- अवैधपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर सावदा पोलिसांच्या छापा, 60 किलो मांस जप्त, एक जणांवर गुन्हा दाखल
- आज रविवार रोजी एरंडोल येथे ‘राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद’चे आयोजन.. राज्यभरातून विविध मान्यवरांची व संविधान प्रेमीची राहणार उपस्थिती.