नोएडा :- मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दादरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या एका विद्यापीठातील विद्यार्थ्याची त्याच्याच चार मित्रांनी हत्या केली. मृत विद्यार्थ्याचे नाव यश मित्तल असून तो सोमवारपासून बेपत्ता होता.त्यानंतर त्याचे वडील दीपक मित्तल यांना सहा कोटींच्या खंडणीबाबत संदेश येऊ लागले. यानंतर दीपक मित्तल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी केलेल्या तपासात हे धक्कादायक सत्य समोर आले.दीपक मित्तल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विद्यापीठाच्या वसतीगृहातील सीसीटीव्ही चित्रण तपासले.
त्यामध्ये यश फोनवर बोलत बोलत बाहेर पडताना दिसत होते. पोलिसांनी त्यावेळचे कॉल रेकॉर्ड तपासले असता, यश मित्तल रंचित नावाच्या मित्राशी बोलत असल्याचे समजले. या पुराव्यावरून पोलिसांनी रंचितला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्याच्या चौकशीतून पोलिसांना समजले की, रंचित, शिवम, सुशांत आणि शुभम या चार मित्रांसह यश मित्तल अनेकदा पार्टी करण्यासाठी जात असे.सोमवारी (दि. २६ फेब्रुवारी) यशला पार्टीसाठी फोन आला. सर्व विद्यापीठापासून १०० किमी दूर असलेल्या उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथे पार्टी करण्यासाठी शेतात गेले. मात्र पार्टी दरम्यान काही कारणांवरून यश आणि इतर मित्रांमध्ये भांडण झाले.
या भांडणात इतर मित्रांनी मिळून यश मित्तलची हत्या केली. त्यानंतर तिथेच शेतात त्याच मृतदेह पुरला. रंचितने दाखविलेल्या जागेवरून यश मित्तलचा मृतदेह हस्तगत केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साद मिया खान यांनी दिली.यानंतर पोलिसांनी इतर आरोपींचाही माग काढला. रंचितला ताब्यात घेतल्यानंतर इतर आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी इतर दोघांना जेरबंद केलं. चौथा आरोपी शुभम याने पळ काढला आहे. पण त्यालाही लवकरच अटक करू, असेही पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी सांगितले की, हत्या केल्यानंतर यशच्या कुटुंबीयांची दिशाभूल करण्यासाठी खंडणीचे मेसेज पाठविण्यात आले होते. पोलिसांनी शेतातून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर यशच्या पालकांनी एकच टाहो फोडला. नोएडा विद्यापीठात यश बीबीएच्या पदवीचे शिक्षण घेत होता.
हे पण वाचा
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.