गुरुग्राम (हरियाणा):- जिल्ह्यात ऑनर किलींगची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नातेवाईकांनी १८ वर्षांच्या मुलीची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा तपास सुरू आहे.तसेच आरोपींनी पीडितेची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह जाळल्याची माहिती समोर आली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार ही घटना गुरुग्राममधी सोहना येथे घडली होती. खोट्या प्रतिष्ठेपायी एका १८ वर्षीय तरुणीला जिवे मारण्यात आले. आता या ऑनर किलिंग प्रकरणी पोलिसांनी मृत तरुणीचे वडील, भाऊ आणि काका यांना अटक केली आहे.
तर २ आरोपी फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारी रोजी ही तरुणी क्लाससाठी निघाली होती. मात्र ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीचा तपास करत असताना पोलिसांनी ३३ दिवसांनंतर ऑनर किलिंगच्या धक्कादायक घटनेचा उलगडा केला. प्राथमिक तपासामध्ये ही तरुणी कुठल्या तरी मित्रासोबत ३१ जानेवारी रोजी बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी या तरुणाच्या नातेवाईकांनी तरुण आणि तरुणीला परत बोलावले आणि त्या तरुणीला तिच्या कुटुंबीयांकडे सोपवले.
मात्र तिने कुटुंबाची प्रतिष्ठा, मानमर्यादा धुळीस मिळवली असं वाटू लागल्याने वडील, भाऊ आणि काका यांनी ३ फेब्रुवारी रोजी या तरुणीची हत्या केली. ३ फेब्रुवारी रोजी अगदी योजनाबद्ध पद्धतीने आरोपी बलबीर आणि त्याचा मोठा भाऊ तसेच इतरांनी मिळून या तरुणीला गाडीमध्ये बसवले. तिथे तिची गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह आरवली पर्वतात नेऊन तिथे त्याचं दहन केलं. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे पण वाचा
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.